मुर्तिजापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटा चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भगिनींना दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा(लाल शाळा) शिवाजीनगर मुर्तिजापूर येथे “भाऊ येतोय, भेटीला” या विशेष उपक्रमा निमित्य आयोजित महिलांना रक्षाबंधन दिनी सुरक्षा कवच चे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे येथील डी. पी रोड स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गट चे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने यंदाच्या रक्षाबंधन दिनी महिलांना “भाऊ येतोय, भेटीला” या आगळ्या-वेगळ्या अनोख्या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे. सक्षक्त व समृद्ध समाज निर्मिती करीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खास रक्षाबंधन दिनी आपल्या बहिणींना भेटण्यास भाऊ येतोय, भेटीला” हा उपक्रम मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गरजू महिलांना विमा सुरक्षा कवचाची रक्षाबंधन भेट देण्यात येणार आहे . मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका , विधवा परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्यासह गरजू महिलांना ५ लक्ष रुपयांचा विमा सुरक्षा कवचाचे वितरण प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या वतीने करण्यात येणार असून या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव गावंडे, सहकार नेते ऍड. सुहास तिडके, संतोष दादा कोरपे, राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई मिरगे, प्रदेश प्रवक्त्या तेजस्विनीताई बारब्दे, अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर मोरे, परिमल लहाने, विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे, जिल्हा महासचिव आनंद वानखडे ,शहराध्यक्ष राम कोरडे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे आदी मान्यवरांची विशेष उपस्थितीत राहणार असल्याचे ही या वेळी सांगण्यात आले.
सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता गरजू महिलांनी सोमवार दि. १९ रोजी सकाळी ११. ते २ वाजेपर्यंत आपले आधार कार्ड व आधार कार्ड ला लिंक असलेले मोबाईल नंबर सोबत आणवा असे आवाहन सम्राट डोंगरदिवे यांनी केले आहे. तर सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.