मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातल्या जिवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात अधिकाऱ्यांनी २९ वर्षीय तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केलीय.. इथेच न थांबता तिच्यावर बळजबरी करित चुंबन (KISS) घेतलाय. असा आरोप तरुणीने केलाय, मात्र हे प्रकरण घडलच नसून उलट तरुणीच्या विरुद्ध मुर्तिजापूर शहर पोलिसांत अधिकाऱ्याने NC दाखल केली आहे. असे दोन्ही अधिकार्यांचे म्हणणे आहे. तरुणीने केलेले आरोप खोटे असून तरुणीला कार्यालयात येण्यास मज्जाव केल्यामुळे तिने असे खोटे आरोप केले असल्याचे अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही अधिकारी यांनी खुलासा करीत एक पत्र महाव्हॉईस न्युजला पाठविले असून सदर पत्रात… २९ वर्षीय ही मुलगी कंत्राटदारामार्फत कार्यालयात काम करण्याकरिता होती, परंतु तिचे काम आणि राहणीमान संशयास्पद असल्यामुळे उपविभागीय अभियंता श्री कपिले यांनी कंटाळा आला होता. त्यांनी मार्च 2024 लाच त्या महिलेला कामाहून बंद केले होते. त्यामुळे एप्रिल 2024 मध्ये कार्यालयात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही मुलगी कार्यालयीन रेगुलर कर्मचारी नसून कार्यालयात येऊन त्रास देत असल्यामुळे तिला कार्यालयात येण्याचा मज्जाव केला होता. त्याबाबत कार्यालयाचे पत्र क्रमांक 346 दिनांक 25 /6 /2024 ला शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर ला दाखल केले त्याची पोच पावती जोडण्यात येत आहे. तसेच दिनांक 25 जुन 2024 रोजीची एनसी कॉपी जोडण्यात येत आहे, तसेच कपिले साहेबांचे जावई श्री बिजवे यांना सुद्धा फोन करत धमकी दिली की, कपिले यांची तक्रार करून संपवतो त्याची तक्रार व यांची कॉपी जोडली आहे. सदर तक्रारदार गावंडे हिला कार्यालयात येण्यास मज्जाव केल्यामुळे तिनेही खोटी तक्रार दिली आहे. तिच्यामागे हिचा पाळलेला कंत्राटदार असून सखोल चौकशी करून चुकीची तक्रार देणाऱ्या महिलेवर कारवाई व्हावी.
या आधी ही या घटस्फोटित महिलेने बऱ्याच अधिकारी आणि कर्मचारी यांना अशाच प्रकारे धमक्या आणि त्रास दिल्या असल्याचे दस्तावेज आहेत. तसेच कार्यालयीन महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या बऱ्याच तक्रारी आहेत. त्याबाबत च्या तक्रारी दस्तावेज ही आमच्याकडे प्राप्त आहेत. ती कार्यालय नियमित कर्मचारी नसून तिला कार्यालयात मज्जाव केल्यामुळे तिनेही खोटी तक्रार दिली आहे. असे पत्र महाव्हाईस न्युज ला दिले आहे ..