Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्यविज पडून इसमाचा जागेवरच मृत्यु - आदिवासीबहुल भागातील सिंदेवानी येथील घटना...

विज पडून इसमाचा जागेवरच मृत्यु – आदिवासीबहुल भागातील सिंदेवानी येथील घटना…

रामटेक – राजू कापसे

अंगावर विज पडल्याने एका ३५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दि. १० जुलै ला दुपारी ४ च्या सुमारास तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील सिंदेवानी येथे घडली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आनंद शंकर कुमरे रा.मनसर कांद्री हल्ली मुक्काम सिंदेवानी असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा कांद्री ( मनसर ) येथील रहीवाशी होता. मात्र सिंदेवानी येथे सासऱ्याकडे तो घरजावई म्हणुन राहात होता तसेच सासऱ्याची शेती वाहात होता.

आज दुपारी ४ वाजता दरम्यान पाऊस सुरू झाल्यावर मृतक आनंद ने शेतातील बैल सोडले व लगबगीने घराकडे परत जाण्यासाठी निघाला असता गावापासुन काही अंतरावर तो येऊन पोहोचला असतांना तोच त्याच्या अंगावर विज पडली व त्याचा जागेवरच करुण अंत झाला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. देवलापार पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: