गेल्या पाच सहा महिन्यापासून मूर्तिजापूर मतदार संघातून गायब असलेले भावी आमदार नेमके गेलं कुठ?…असा मूर्तिजापूरातील सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. कारण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेद्वारच्या निवडणुक प्रचारासाठी भावी आमदार उपलब्ध नसून उटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करीत आहे. आणि साहेबाला आघाडीची तिकीट पाहिजे. सध्या आघाडीच्या उमेद्वारच्या नावाची चर्चा असून जर निवडून आले तर या भावी आमदाराला तिकीट देण्यासाठी प्रयत्न करतील का?
पाच सहा महिन्या पूर्वी मतदार संघात पैश्याच्या बळावर आपल तात्पुरते नाव केलं आणि लोकांनाही असा दान करणार दानी कोणी मिळाला नव्हता मात्र आता गायब झाल्याने कमावलेलं नाव सर्व गमावून बसले असल्याची नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे. याने लोकांच्या तोंडाला चटक लावून त्याने पळ काढला अशी चर्चा आहे.
तर दुसरीकडे भाऊचा पार्टनर आमदारकीसाठी फिल्डिंग लावत असून भाऊच्या ऐवजी त्याला तिकीट मिळाली पाहिजे यासाठी त्याने देव पाण्यात ठेवले असल्याची चर्चा आहे. हा भावी लोकसभेच्या उमेदवाराला अस दाखवायचा प्रयत्न करत आहे के भाऊ त्याच्यापुढे कीस खेत कि मुली. कारण कोणताही लीडर आला तर त्याच्या पुढे पुढे करून त्याच्या सोबत फोटो काढून सोशल मिडीयावर टाकून त्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची…जाळण्याचा प्रयत्न करीत आहे. हा बहाद्दर मोठा कलाकार असून त्याने एवढा अफाट पैसा कोठून आणला हाही प्रश्न उपस्थित करीत आहे. अगोदर त्याने आपला मतदार संघ सोडून बाजूच्या मतदार संघात एन्ट्री केली होती मात्र बाजूचा मतदार संघातील कार्यकर्ते हुशार असल्याने याची डाळ तेथे शिजली नाही.
एक भावी एका जि.प. सर्कलचा प्रतिनिधी असून त्या सर्कलच्या जनतेला वाऱ्यावर सोडून गेला, जेव्हा सर्कलमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं होते तेव्हाही भावी अजिबात फिरकले नाहीत फोन तर कोणत्याही कार्यकर्त्याचा उचलत नाही. आणि यांना आमदार व्हायचं आहे. कार्यकर्ते मेले की जिवंत आहेत अजिबात काळजी नाही. कारण त्यांना माहिती आहे की पैश्याच्या बळावर आपण पुन्हा नाव करू पैसे दाखवले की लोक आपल्या पाठीमागे धावत येतात.
जुने कार्यकर्त्याची अवस्था फार वाईट आहे, ते अलिकडून गेले आणि पलीकडूनही त्यांना आधी लक्झरी गाडीची सवय लावून दिली मात्र आता भर उन्हात आपल्या बाईकने फिरत असल्याचे दिसतात आणि भावी आमदारच नाव काढल की मग भावीच्या परिवाराचा उद्धार करतात. या भावी बद्दल लोकांना आधीच माहिती दिली होती पण कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते आता मात्र….