न्यूज डेस्क – मुंबईतील एका अभिनेत्री, मॉडेलने टांझानिया देशात राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय उद्योगपतीवर हल्ला आणि बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी शहरातील एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. मॉडेलने यासंदर्भातील दोन व्हिडिओ पोलिस आणि मीडियाला दिले आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी मॉडेलला मारहाण करत असल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.
पीडित मॉडेलने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आरोपी विरेन पटेल याच्याशी वर्षभरापूर्वी एका वाढदिवसाच्या पार्टीत भेटली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलू लागले. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढू लागली. वीरेन पटेलने तिला लग्नाचे वचन दिले आणि तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. यानंतर तो अनेकदा दारू पिऊन माझ्याशी भांडू लागला, धमक्या देऊ लागला. त्याच्या छळामुळे व्यथित झालेल्या मॉडेलने आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६, ३२३, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी विरेन पटेल याला अटक केली आहे.