Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यनांदेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मान्‍सून पूर्वतयारीची रंगीत तालीम...

नांदेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मान्‍सून पूर्वतयारीची रंगीत तालीम…

नांदेड – महेंद्र गायकवाड

जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्यावतीने आज सकाळी १० वाजता काळेश्वर घाट, विष्णुपूरी येथे जिल्हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांच्‍या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मान्‍सून-२०२४ पूर्वतयारी-पूर परिस्‍थिती शोध व बचावाबाबत रंगीत तालीम संपन्‍न झाली.

माहे जूनमध्‍ये मान्‍सूनचे आगमन होणार आहे. मान्‍सूनच्‍या काळात अतिवृष्टी होऊ शकते. नदीकाठच्‍या गावात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पूर परिस्‍थ‍ितीच्‍या वेळी जिवीत व वित्त हानी कशी टाळता येऊ शकते. यासाठी पूर परीस्‍थ‍ितीत शोध व बचाव कसा करावा याबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणाचे प्रशिक्षण काळेश्‍वर घाट विष्णुपूरी येथे संपन्‍न झाले. यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, अग्‍नीशमन दल, शीघ्र प्रतिसाद दल, गृहरक्षक दल, उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय, पंचायत समिती नांदेड व इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या रंगीत तालीमेस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्‍नीशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे यांनी केले तर आभार तहसिल कार्यालयाचे रवि दोंतेवार यांनी मानले.

यावेळी मंडळ अधिकारी पी.व्‍ही.खंडागळे, ए.एम. धुळगुंडे, एस.डी.देवापुरकर, प्रमोद बडवणे, गृहरक्षक दलाचे एम.बी.शेख, प्रवीण हंबर्डे, बालाजी सोनटक्‍के, मंडगीलवार आर.बी., गौरव ति‍वारी, कोमल नागरगोजे आदींनी परीश्रम घेतले. तर मनपा नांदेड, पोलीस क्‍यु.आर.टी., होम गार्ड,जिल्हा शल्‍य चिकित्सक कार्यालयाचे आरोग्‍य पथक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पोलीस पाटील कोतवालासह विविध यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्‍थ‍ित होते.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: