Saturday, July 13, 2024
spot_img
Homeशिक्षणरामटेक | ६० वर्षाच्या आजीने मिळविले दहावीत ६०% गुण...

रामटेक | ६० वर्षाच्या आजीने मिळविले दहावीत ६०% गुण…

प्रकाश हायस्कूल कान्द्री-माईन येथील यशाची परंपरा कायम.
सुजाता पाटील असे ६० वर्षीय आजीचे नाव.

रामटेक – राजू कापसे

रामटेक – प्रकाश हायस्कूल कान्द्री-माईन इयत्ता १० वी चा निकाल ८८.४६% इतका लागला असून यावर्षी शाळेतुन मुल प्रथम श्रेणी तर मुली व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामहित शिक्षण संस्थेचे डॉ. राजेंद्र दखणे व संस्थेचे सचिव डॉ. रश्मी दखणे यांनी अभिनंदन व शुभेच्छा देत निकालावर समाधान व्यक्त केले.
तालुक्यातील कांद्री माईन येथील सुजाता पाटील यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दहावी परीक्षा दिली.

आणि घवघवीत यश देखील मिळवले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात.त्यांनी हे काम करत असताना त्यांनी दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला. दररोज शाळेत जाणे शक्य होत नसल्याने १७ नंबरचा फॉर्म भरला.व त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. घरातील कामाची जबाबदारी आणि अंगणवाडी सेविका म्हणून असलेली काम अशी दुहेरी कसरत करीत अभ्यास केला.तर घरातील मंडळींनी त्यांना चांगले सहकार्य केले.

याचाच फलित म्हणून सुजाता पाटील रा.कान्द्री या आजींना चक्क ६०% गुण मिळविले.यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा या निकालाची चर्चा जास्त प्रमाणात झाली.
त्यांना इतिहास-भूगोल ५२,मराठी ५१, इंग्रजी ५८, हिन्दी ४६, गणित ७०, विज्ञान ६६ अशा पध्दतीने गुण प्राप्त केले असून त्यांनी ५०० पैकी ३०० गुण मिळवून त्यांना त्यांच्या यशाला गवसणी घातली आहे.

इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपण कोणत्याही वयात यशाला गवसणी घालू शकतो असा संदेश या माध्यमातून त्यांनी दिला आहे. शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी आदिवासीबहुल भागातील शाळेतील प्रगतीचे कौतुक केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: