Thursday, June 20, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक येथील दुकाने व आस्थापनावर मराठी नामफलक लावण्यासाठी मनसे चे तालुक्यातील अधिकार्‍यांना...

रामटेक येथील दुकाने व आस्थापनावर मराठी नामफलक लावण्यासाठी मनसे चे तालुक्यातील अधिकार्‍यांना निवेदन…

रामटेक – राजू कापसे

महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्याकरिता सर्वोच्च न्यायलयाने दोन महिन्यांची वाढीव मुदत दिली होती. ती मुदत २५ नोव्हेंबर २०२३ ला समाप्त झाली असूनही काही आस्थापनांवर व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात आल्या नाही.

त्यामुळे नागपूर जिल्हाध्यक्ष शेखरभाऊ दुंडे व नागपूर जिल्हा संघटक सचिन नागपूरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच तालुका उपाध्यक्ष राकेश (रॉकी) चवरे यांच्या नेतृत्वात रामटेक उपविभागीय अधिकारी,रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी ,रामटेक तहसील कार्यालय , गट विकास अधिकारी पंचायत समिती रामटेक व रामटेक नगरपरिषद कार्यालय यांना लवकरात लवकर मराठी पाटी विषयी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी याकरिता निवेदन देण्यात आले.

या वेळेला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष रोशन भाऊ फुलझले,रामटेक विधानसभा सचिव सुरज भाऊ दुन्डे ,पारशिवनी तालुका उपाध्यक्ष विक्की भाऊ नांदुरकर,रामटेक शहर अध्यक्ष सागर भाऊ चांदेकर , उपेश भाऊ गाढवे , शारिक भाऊ पठान, रतन भाऊ वासनिक, मनोहर भाऊ भगत, संदीप भाऊ भालेराव , संजू भाऊ व अन्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: