रामटेक – राजु कापसे
रामटेक येथे सकाळी सहा वाजतापासूनच मतदानाला सुरुवात झाली. रामटेक विधानसभेत एकूण ३५७ मतदान केंद्रे होती. सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली.
मात्र, दुपारच्या सुमारास मतदानाची गती मंदावली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर सरासरी ६६ टक्के मतदान झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे.
रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथे प्रशांत हटवार नामक नवरदेवाने लग्नस्थळी जाण्यापूर्वी नवरदेव बाण्यात मतदानाचा हक्क बजावला. तर रामटेक विधानसभेचे आमदार आशिष जयस्वाल यांनीसुद्धा काचुरवाही येथे जाऊन मतदान केले.
त्यांच्यासोबत काचुरवाही ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिकेत गोल्हर,सुभाष नागोसे,रोशन ढोबळे,विक्की बावनकुळे,दिनेश चरडे,प्रणित बावनकुळे,नाना चवडे,अविनाश डोकरीमारे यांनी मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावला.