आकोट- संजय आठवले
तथाकथित कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची संविधान विरोधी भूमिका, रुद्राक्ष वाटपात झालेला अपघात आणि अनेक चमत्कारांचे दावे यासंदर्भात त्यांचेवर कायदेशीर कारवाईची मागणी आणि पुढील आंदोलनाची रणनीती, दिशा ठरवण्यासाठी विविध सामाजिक संघटनांची व्यापक बैठक गुरुवार दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी (१०) दहा वाजता स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित केली आहे.
या बैठकीला विश्व वारकरी सेनेचे प्रमुख बुरघाटे महाराज, निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक तथा समाजसेवक गजानन हरणे आणि संविधान सन्मान मंचाचे व पुरोगामी विचाराचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदीप मिश्रा यांच्या शिव कथा आयोजनाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांनी केलेल्या चमत्कार आणि इतर अवास्तव दाव्यांना आणि संविधान विरोधी वक्तव्याला तीव्र विरोध असल्याचे या सामाजिक संघटनेचे म्हणणे आहे.
तरी या बैठकीला पुरोगामी आणि संविधान प्रेमी, बहुजन विचार धारा, अंधश्रद्धा निर्मूलनात काम करणाऱ्या जागरूक नागरिक महिला युवक युवतीना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.