Monday, November 18, 2024
Homeराजकीयभारतीय जनता पार्टीच्या रामटेक विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक गंगा सेलिब्रेशन हॉल, आंबेडकर चौक,...

भारतीय जनता पार्टीच्या रामटेक विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक गंगा सेलिब्रेशन हॉल, आंबेडकर चौक, रामटेक येथे संपन्न…

रामटेक – राजु कापसे

भारतीय जनता पार्टीच्या रामटेक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक मा.प्रदेशाध्यक्ष आमदार.चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा उपस्थितीत गंगा सेलिब्रेशन हॉल, आंबेडकर चौक, रामटेक येथे संपन्न झाली. या बैठकीत रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या झालेल्या पराभवासंदर्भात विचार मंथन केले. या लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्या उणिवा राहिल्या त्याची पुनरावृत्ती विधानसभेला न होऊ देता आणखी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन मा.प्रदेशाध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी कार्यकर्त्यांना केले.

प्रत्येक कार्यकर्त्याला मा.प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्येक बूथ वर पन्नासमतदान वाढविण्याचे लक्ष दिले.ज्या बूथ वर लोकसभा निवडणुकीत कमी मताधिक्य मिळाले अश्या बूथवर घरोघरी जाऊन मताधिक्य वाढविण्याचे व जनसंपर्क वाढवून जनसमस्या एकूण त्याचे निवारण करण्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी पंचायत समिती उपसभापती उदयसिंह(गज्जु)यादव यांचे भाजपा जिल्हा महामंत्री म्हणून भाजपाप्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी नियुक्ती केली.

याप्रसंगी भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य राजीव पोतदार,माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,जिल्हा महामंत्री अनिल निधान,जिल्हा महामंत्री रिकेश चवरे,जिल्हा महामंत्री आदर्श पटले,प्रदेश किसान आघाडी सचिव सुधाकर मेंघर, प्रदेश सदस्य अविनाश खळतकर,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आशिष फुटाणे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुरधाताई अमीन ,संजय मुलमुले,राजेश ठाकरे,अतुल हजारे,योगेश वाडिभस्मे,राहुल किरपान,कैलास बरबटे,लक्ष्मण केने,वेंकट कारेमोरे,सतीश डोंगरे,रवी चौहान,रेखाताई दूनेदार सह रामटेक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकरी, कार्यकर्ते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: