पाच कामगारांचा भाजून कोळसा, स्फोटात पाच कामगाराचा मृत्यू, पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची माहीती…
कोंढाळी/काटोल – अतुल दंढारे
गुरूवार १३ जून चे दुपारी एक ते दिड वाजता चे दरम्यान नागपूर अमरावती महामार्गावरील नागपूर वरुन ३०कि मी अंतरावरील धामना गावा लगत चामुंडा दारू गोळा कंपणी मधे स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की या स्फोटात चार महिला एक पुरुष असे पाच कामगारांचा भाजून कोळसा झाला. तर अनेक कामगारांना उपचारासाठी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटणास्थळी पोहचले तर नागपूर पोलीस कमिशनर रविंद्र सिंघल पोलीस ताफ्या सह घटना स्थळावर डेरेदाखल झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील चामुंडा कंपनी मधे स्फोटा पूर्वी सहा महिन्यां आधी महामार्गावरील चाकडोह येथील बारूद कंपनीतही स्फोट झाला होता. यात ही नऊ कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तेंव्हा सोलार एक्स्प्लॉजिव इंडस्ट्रीज कडून प्रत्येकी २५लाखाचे धनादेश देण्यात आले होते.
तर सरकार कडून ही मृतकाचे कुटूंबियांना पाच लाखांची घोषणा केली होती. धामना येथील चामुंडा दारूगोळा कंपनी चे स्फोटात मृतकांचा आकडा पांच असल्याचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे सांगितले जाते.
महामार्गावर चक्का जाम घटनेचे गांभिर्य पाहता स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकार्यांनी चामुंडादारूगोळा कंपनी प्रशासनाणे हलगर्जीपणा बाबद काही काळ चक्का जाम केला होता. पोलीसांनी वेळीच दखल घेतली व आंदोलकांना ताब्यात घेतले.व महामार्गवाहतूक सुरळीत केली आहे.
मृतकाची नावे
१) प्रांजली मोंदरे वय २२ वर्ष मृतक
२) प्राची फलके वय २० वर्ष मृतक
३) वैशाली क्षीरसागर वय २० वर्ष
४) मोनाली अलोने वय २७ वर्ष सर्व रा. धामना
५) पन्नालाल बंदेवार वय ५० वर्ष रा.सातनवरी
चार महिला सह एक पुरुष ठार.
शीतल टचप वय ३० वर्ष रा. धामना, हि महिला गंभीर
दायसा मरस्कोल्हे वय २६ वर्ष धामना गंभीर महिला
श्रद्धा पाटील वय २२ वर्ष धामना गंभीर महिला
प्रमोद नेहारे वय ३५ वर्ष नेरी( मानकर) गंभीर पुरुष
गंभीर जखमीन वर नागपूर सेन गुप्ता हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.