Saturday, July 27, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीमालेगाव | कर्जाला कंटाळून इसमाची आत्महत्या...

मालेगाव | कर्जाला कंटाळून इसमाची आत्महत्या…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नंधाना येथे दिनांक ०८ जून रोजी गावातीलच रहिवासी इसम योगेश प्रभाकर बोरकर वय ३७ यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सविस्तर असे कि, नंधना येथील युवा शेतकरी योगेश प्रभाकर बोरकर हे दिनांक ०५ जून पासून घरून निघून गेले होते, नातेवाईक त्यांचा सर्वत्र शोध घेत होते दरम्यान दिनांक ०८ जून रोजी नंधाना गावाजवळ असलेल्या अनिल दामोदर डाले यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत योगेश प्रभाकर बोरकर याचा मृत देह आढळून आला.

घटनेची माहिती मृतकाचा भाऊ संदीप प्रभाकर बोरकर याने शिरपूर पोलिसांना दिली.माहिती प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षण रवींद्र ताले बीट जमदार रवींद्र वानखेडे व सहकारी यांनी घटना स्थळी भेट देवून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय मालेगांव येथे पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: