गुजरातमधील दरियापूरमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान एक अपघात झाला आहे. रथयात्रेदरम्यान एका इमारतीची बाल्कनी कोसळली, त्यात सुमारे 11 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रथयात्रेच्या मार्गावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग कोसळला. यावेळी अनेक लोक भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी खाली उभे होते. बाल्कनीचा काही भाग भाविकांच्या अंगावर पडल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तीन मुलांसह 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रथयात्रा मार्गावरील सर्व धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना अहमदाबाद महापालिकेने नोटीस द्यावी, असे सांगण्यात येत आहे. कडियानाकाजवळ ज्या इमारतीत अपघात झाला ती इमारतही जीर्ण अवस्थेत होती. मात्र, याप्रकरणी प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
◆ गुजरात: अहमदाबाद में जगन्नाथ रथ यात्रा के दौरान बड़ा हादसा
— News24 (@news24tvchannel) June 20, 2023
◆ इमारत की बालकनी गिरने से 11 घायल#RathYatra | #AhmedabadRathYatra | #Ahmedabad pic.twitter.com/hOqywEJGP3
कडियानाकाजवळील एका जुन्या घराचा मालक तीन जणांसोबत रथयात्रा पाहण्यासाठी उभा होता, असा दावा अनेक अहवालात केला जात आहे. दरम्यान, अचानक तो स्लॅब कोसळून खाली पडले. सध्या 11 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
रथयात्रेदरम्यान आजूबाजूच्या लोकांना ट्रकमधून प्रसाद वाटप करण्यात येत असताना ही घटना घडल्याचा दावाही केला जात आहे. लोक प्रसाद घेण्यासाठी खाली उतरले तेव्हा बाल्कनी पडली आणि अनेकांना त्याचा फटका बसल्याचे स्थानिक लोक सांगतात. मात्र, रथयात्रा कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे.