प्रिय वाचकांनो, दर्शकांनो
आज ३० जून महाव्हाईस न्यूज वेब पोर्टल, युट्युब चॅनलला ६ वर्ष पूर्ण होत आहे, तुम्ही दिलेलं भरपूर प्रेमाच्या जोरावर इथपर्यंत प्रवास शक्य झालाय. ‘महाव्हाईस’ म्हणजे मी एकटा नव्हे, तर प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्ती याचा मालक आहे. हा तुमचा आवाज आहे तुम्हीच याला मोठ केलंय, संभाळलय. यापुढेही सांभाळून घ्याल अशी आशा आहे. महाव्हाईस हे केंद्र सरकार आणि गुगलच्या सर्वच नियमांचं पालन करते. अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवीत असताना बातमीत ग्रामरच्या बऱ्याच चुका होतात हे प्रामाणिकपणे मान्य करतो, कधी कधी हेडलाईन मध्ये चुका होतात कारण एकटा माणूस दिवसाला 20 ते 25 बातम्या करताना घाईघाईने अश्या चुका होतात, ब्रेकिंग बातमी किंवा विशेष बातमी आपल्या पर्यत कशी लवकरात लवकर पोहचेल यासाठी खटपट असते…
या 6 वर्षात अनेक कठीण प्रसंगांना समोर गेलोय, अनेक बड्या लोकांच्या धमक्या, कोर्टाच्या नोटीसा आल्यात पण घाबरलो नाही, तुमच्यासाठी लिहितच राहिलो. जे बातमी कोणी करणार नाही तीच बातमी मी करतो याचा फायदा काही फालतू राजकीय लोकांनी घेतला होता पण नंतर समजलं हा व्यक्ती चुकीचा आहे, चुकीचे जे करणार त्याची पोलखोल तर होणारच. लिहण्याची हिम्मत आणि बळ तुमच्यामुळे मिळते.
अनेक जण सोशल व्हायरल बातम्यांवर कमेंट करतात पण अश्या बातम्यांमुळेच गुगलच्या जाहिरातीचा महाव्हाईसला फायदा होतो, त्यामुळे कोणाच्या पुढं हात पसरायची गरज पडत नाही. जेव्हा जाहिरातीवर क्लिक होणार तेव्हाच त्याचा फायदा महाव्हाईसला मिळणार, तुमच्या या योगदानावर हे सर्व सुरु आहे. सोबतच वर्धापन आणि दिवाळीच्या जवळचे मित्र जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत करतात तेही कपाळावर आठ्या न पडता. अनेक जवळचे मित्र जे भाजपा मध्ये आहेत त्यांची नेहमीच तक्रार असते, आमच्या विरोधात लिहतो. मात्र मी भाजपा विरोधक नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा सपोर्टर नाही उलट भाजपमधील माझे खास मित्र मला जाहिराती स्वरूपी मदत करतात पण मोठे नेते तेवढाच राग करतात कारण त्यांच्या PR बातम्या घेत नसल्याने असावे कदाचित.
महाव्हाईस चे अवघ्या महाराष्ट्रात आणि भारताबाहेर आपले वाचक, दर्शक आहेत, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहचावी यासाठी लवकरच MV App घेवून येत आहो. अनेकजण रोखठोक लेखणीचे दिवाने आहेत. अनेकांचा मोठा विश्वास महाव्हाईस वर आहे आणि त्याला कधीही तडा जाणार नाही याची ग्वाही देतो…स्वतंत्र पत्रकारितेला जिवंत ठेवण्यासाठी मदत केल्याबद्दल आपला ऋणी आहे..…
गजानन गवई, मुख्यसंपादक
महाव्हाईस न्यूज, अमरावती