Thursday, September 12, 2024
spot_img
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात घिरट्या घालणारे पार्सल उमेदवार संकल्प घेऊन झाले सक्रिय…

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात घिरट्या घालणारे पार्सल उमेदवार संकल्प घेऊन झाले सक्रिय…

विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे, त्याआधीच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भावी आमदार सक्रिय झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील काही भावी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरले आहे. त्यासाठी त्यांनी मूर्तिजापूर शहरात कार्यक्रमाची रीग लावली आहे. तर कोणी नेत्याचे वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित करून आपलं नाव पुढे करण्याचा प्रयत्न सुरू करीत आहे, तर काही सामाजिक उपक्रमाच्या नावावर प्रचाराचे कार्यक्रम सुरू केले आहेत. यांच्या आयोजित कार्यक्रमाचा उद्देश फक्त एवढाच की त्यांना या विधानसभेत उभ राहण्यासाठी असतो. इतरवेळी हे भावी आमदार गायब असतात. विशेष म्हणजे अजून हे उमेदवार कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत हे निश्चित नसून सुद्धा मैदानात उतरले आहेत. तर काही एकाच पक्षाच्या तिकिटासाठी भली मोठी गर्दी असून सुद्धा वारेमाप खर्च करीत आहेत. तिकीट मिळणार नाही हे माहित असून सुद्धा काही हौशी नेते आपली चांगली हौस भागवत आहेत. यामध्ये पक्षासाठी एकनिष्ठ असलेले बरेच भावी उमेदवार आहेत मात्र त्यांच्याकडे एवढा पैसा नसल्यामुळे ते चिडीचूप आहेत.

विशेष म्हणजे हे हौशी भावी उमेदवार पैशाच्या जोरावर येथील प्रसिद्धी मिळविण्यासाठी दोन चार उपाशी पत्रकारांना हाताशी धरून बातम्या प्रसारित करायला लावतात. वास्तविक यांना या मतदारसंघात कोणीच ओळखत नाही, पैशाच्या ताकदीवर मतदार संघात नाव करण्याचा सध्या प्रयत्न सुरु आहे. मात्र गेल्या १० ते १५ वर्षापासून मतदारसंघात सत्ता नसतानाही लोकांचे काम करून नाव केलेले काही भावी आमदार प्रचंड मेहनत आणि पैसा खर्च करून गेलेले ते सध्या शांत असल्याचे दिसत आहेत. पण येत्या महिन्यात तेही सक्रीय होतील. ते सक्रीय झाल्यावर मग यांचा निभाव त्यांच्यापुढे लागणार नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

खर तर हा मतदार संघ गेल्या 15 वर्षापासून एकाच पक्षाच्या हातात असून सुद्धा मतदारसंघातील अनेक गावे मुलभुत सुविधेपासुन वंचित आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील बरीच गावे आहेत ज्या ठिकाणी रस्ता,पाणी नाहीत तरीपण प्रतिनिधीला कोणी प्रश्न विचारत नाही. एवढी दहशत या प्रतिनिधीची आहे. एवढच काय तर मूर्तिजापूर शहरातील पाणी प्रश्न अजून सुटला नाही तरीपण आम्ही याच आमदाराला निवडून आणू असा काही कार्यकर्त्यांचा सूर जरी असला तरी यावेळेस मतदार संघातील चित्र वेगळे राहणार आहे. या मतदारसंघात या प्रतिनिधी बद्दल प्रचंड नाराजी आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना सुद्धा माहिती असल्याने यावेळी सत्ताधारी पक्ष उमेदवार बदलणार आहेत. या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांची ज्यांना जान आहे तोच उमेदवार यावेळी निवडून येणार असल्याचे येथील जनतेचा कौल आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो. लादलेला, पैसेवाला, अश्या नकली समाज सेवकाला घरचा रस्ता दाखवतील हे निश्चित.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: