Tuesday, June 25, 2024
spot_img
Homeविविधखापा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी...

खापा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी…

राजु कापसे
रामटेक

आज दिनांक -१०-०५-२०२४ रोज शुक्रवार ला सकाळी -१०-०० वाजता नगर परिषद कार्यालय, खापा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी खापा येथिल लिंगायत समाज बांधव तसेच नगरपालिका कार्यालय कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.कैलास कापसे माजी अध्यक्ष न.प.खापा तसेच श्री.अनिलजी मेनकुदळे माजी सेवानिवृत्त बांधकाम विभाग कर्मचारी न.प.खापा यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा ला हार घालून तसेच पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

या प्रसंगी सर्व लिंगायत बांधवांनी बसवेश्वर महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकला .या कार्यक्रमाला उपस्थित खापा समाज बांधव श्री.किशोरजी आवते , चंद्रशेखरजी कापसे,, विलास जी आवते, प्रशांत जी आवते, रत्नाकरजी नांदेकर , राजेश जी आवते, आनंद मेनकुदळे, राजेंद्र कापसे, नितीन आवते, योगेश दिवे, दिनेश कापसे, राजन मेनकुदळे,बाबाजी आवते, निरज नांदेकर , सारंग आवते, तसेच इतर लिंगायत समाज बांधव व नगरपालिका कार्यालय कर्मचारी प्रामुख्याने आपली उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेखर जी आवते,, यांनी केले .या कार्यक्रमाची पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी श्री जितेन्द्र जी कापसे यांनी केली तसेच त्यांचे सर्व लिंगायत बांधव यांनी आभार मानले

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: