महेंद्र गायकवाड
नांदेड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा विधानपरिषद सदस्य आमदार राजेश राठोड यांच्या वाहनावर नायगाव तालुक्यातील कहाळा येथे दगडफेक झाली असून आंदोलकानी वाहन पेटवण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.सदरील घटना घटना 31ऑक्टोबर रोजी सकाळी घडली आहे. दरम्यान मी व माझ्या सोबतचे सहकारी सुखरूप असल्याचे आ. राठोड यांनी सांगितले आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवाशी असलेले काँग्रेसचे विधान परिषद सदस्य राजेश राठोड हे नांदेडहून हैद्राबादला निघाले असता त्यांना नायगाव तालुक्यातील कहाळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनास सामोरे जावे लागले आंदोलनस्थळी राठोड यांचे वाहन येताच आंदोलनकर्त्यांनी त्यांचे वाहन रोखले असता त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. सरकारने मराठाआरक्षणावर लवकर तोडगा काढावा व आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे असे आवाहन आ. राजेश राठोड यांनी केले आहे.