Sunday, December 22, 2024
Homeराज्यअबब! चक्क तोतया पोलीस बनून कॉपी पुरवल्याचा प्रकार उघडकीस...

अबब! चक्क तोतया पोलीस बनून कॉपी पुरवल्याचा प्रकार उघडकीस…

१२ वीच्या पहिल्याच पेपर कॉपी पुरवताना तोतया पोलीस गजाआड…

पातुर – निशांत गवई

दिनांक 21/2/ 2024 पासून राज्यसह पातुर शहरात बारावीच्या पेपरला सुरुवात झाली असताना पातुर येथील शहा बाबू उर्दू हायस्कूल येथील केंद्रावर बारावीचे परीक्षा सत्र आजपासून सुरू असताना आश्चर्यकारक रित्या पोलिसांचा गणवेश धारण करून केंद्रावर कॉफी पुरवताना तो त्या पोलिसास पातुर पोलीस निरीक्षक यांनी अटक केली.

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी शहा बाबू हायस्कूल वर बारावीचे सत्र चालू असताना पातुर पोलीस निरीक्षक हे आपल्या टीम सह परीक्षा केंद्रावर गेले असता अनुपम मदन खंडारे व 24 राहणार पांगरा बंदी हा युवक पोलिसांचा गणवेश परिधान करून पॉकेट मधून इंग्रजी विषयाची कॉपी पुरवताना पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी त्यास अटक केली.

चौकशी अंतिम हा युवक तोतया असल्याचे निष्पन्न झाले पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अनुपम खंडारे यांचे विरुद्ध फिर्यादी वसंत राठोड यांचे फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भांडवीचे कलम 417 419 171 महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमन मंडळाच्या इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियमन 1982 कलम सात अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर शेळके करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: