Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeराज्यआलापल्ली येथे माता कन्यका मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न...

आलापल्ली येथे माता कन्यका मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न…

अहेरी – मिलिंद खोंड

आल्लापल्ली येथील आर्य वैश्य समाज द्वारा श्रीवासवी कन्यका माता परमेश्वरी देवस्थान येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या तीन दिवस चाललेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये कलश शोभायात्रा, गणपती पूजन, जागृती भजन पुण्यावाचन, चंडीहवन शैया निवास उद्यापन, मूर्ती जलाभिषेक, जागृती भजन ,मंत्र उपचार व होम हवन,वास्तू पूजन ,महाआरती व महाप्रसाद आदी.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य कागजनगर येथील शर्मा महाराज व इतर पुजाऱ्यांनी केले.

या सोहळ्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच माजी पालकमंत्री अंबरीशराव महाराज ,माजी आमदार दीपक दादा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थिती दर्शवून माता कन्यका परमेश्वरी देवीचे दर्शन घेऊन सर्व समाज बांधवांना सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी परिसरातील समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्य-,वैश्य कोमटी समाज आल्लापल्ली/नागेपल्ली चे अध्यक्ष डॉ.चिमरालवार, सचिव राकेश गण्यारपवार,

कार्यकारी अध्यक्ष विवेक चेलीयालवार ,उपाध्यक्ष रमेश शानगोंडावार,कोषा ध्यक्ष दिलीप बीरेल्लीवार,सुनील आईनचवार,साई मिरालवार,मनोज पत्तीवार ,संदीप बंडावार,व्यंकटेश मद्देरलावार,राजू बीरेल्लीवार,प्रकाश एतावार व सर्व सदस्य गणांनी विशेष परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: