Thursday, June 20, 2024
spot_img
HomeSocial TrendingLavanyaBJ | ट्रेंड करणारी ही लावण्या बल्लाळ जैन आहे तरी कोण?…काय आहे...

LavanyaBJ | ट्रेंड करणारी ही लावण्या बल्लाळ जैन आहे तरी कोण?…काय आहे प्रकरण?…

LavanyaBJ : सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही, यामध्ये राजकीय भाष्य केले तर विचारून नका. असाच एक आज सकाळपासून X वर ट्रेंड करत आहे. लावण्या बीजे ह्या काँग्रेसच्या कर्नाटक मीडिया महासचिव आहेत. आता X वर #LavanyaBJ ट्रेंडिंग का आहे याबद्दल पाहूया.

LavanyaBJ ट्रेंडिंग का आहे?

सोशल मिडिया X वर लावण्या बल्लाळ जैन ह्या भाजपच्या बीजे हा अपशब्द वापरून पक्षाला टोमणे मारत होत्या. काल लावण्‍याने X वर भाजप विरोधात भरपूर ट्विट केले. त्यांच्या ट्विटमध्ये जवळपास सर्वत्र भाजपला बीजे पार्टी असे संबोधले. यापैकी बहुतेक टिप्पण्यांमध्ये त्यांनी बीजेची तुलना गैरवर्तनाशी केली. काही वेळातच त्यांचे ट्विट व्हायरल झाले. यानंतर अनेक यूजर्सनी त्यांच्या ट्विटला रिप्लाय देताना सांगितले की, त्यांच्या नावात बीजेही येते. मग #LavanyaBJ X वर झपाट्याने ट्रेंड करू लागले.

लोक काय म्हणाले?
अनेक वापरकर्त्यांनी #LavanyaBJ या कीवर्डसह ट्विट केले, त्यापैकी बहुतेकांनी लावण्यला सांगितले की भाजपवर टीका करताना ती विसरली की तिच्या नावात बीजे देखील दिसत आहे. याच कारणामुळे आता #LavanyaBJ ट्रेंडमध्ये आहे.

वृत्तपत्र आणि रेडिओमध्ये काम केले
लावण्याने रेडिओ मिर्ची ९८.३ एफएममध्ये आरजे म्हणून काम केले आहे. याशिवाय लावण्याबल्लाळने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रातही काम केले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: