Monday, December 23, 2024
Homeराज्यदिवाणी न्यायालय निर्मितीसाठी जागेची ताबा प्रक्रिया पूर्ण...

दिवाणी न्यायालय निर्मितीसाठी जागेची ताबा प्रक्रिया पूर्ण…

मूर्तीजापुर – नरेंद्र खवले

स्थानिक दिवाणी न्यायालयाची नवनिर्मित वास्तु निर्मितीसाठी कझंरा रोडवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जागा सर्वानुमते मंजूर करण्यात आली होती.

या जागेसंबंधीचे सर्व कागदोपत्री कार्यालयीन सोपस्कार पूर्णतः जाऊन. १९ जून २०२३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे अमरावती सर्वेक्षक बी .एस. राठोड यांनी प्लॉट नंबर पी -३/ए,पी-३/बी,पी-३/सी चा ताबा दिवाणी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एम.झेड.ए.ए.क्यू. कुरेशी यांना देण्यात आला.

यावेळी सह दिवाणी न्यायाधीश ए.जी. तांबोळी ,मूर्तीजापुर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड . राजेश हजारी ,ॲड. नरेंद्र काळे, ॲड .निलेश सुसतकर, न्यायालयाचे अधीक्षक महाजन, यावेळी मोका स्थळावर उपस्थित होते .अशी माहिती ॲड . निलेश सुखसोहळे यांनी दिली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: