रामटेक – राजू कापसे
रामटेक दिनांक 09/06/024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने रामटेक येथील गंगा भवन येथे रामटेक विधानसभा -2024 च्या अनुषंगाने पदाधिकारी मंथन बैठक रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात मोठ्या थाटात पार पडली.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडून रामटेक लोकसभेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरगोस मतांनी विजय विजय प्राप्त केला.आता लक्ष्य रामटेक विधानसभा 2024 असून शिवसेना पक्षाने रणशिंग फुकले आहे. पक्ष वाढीच्या दृष्ठिकोनातून व सामान्य जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी शिवसेना पक्ष निकडीने उभा राहील.
गावा-गावात जाऊन पक्षाचे कार्य वाढविणे, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणे, रामटेक विधानसभा हा शिवसेनाचा गड असून ही 2024 विधानसभा शिवसेना मोठ्या ताकतीने लढून रामटेक विधानसभेवर विजय प्राप्त करेल त्यासाठी शिवसेनेचे कठीबद्ध नियोजन असेल व या विधानसभेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या माध्यमातून श्री.विशालभाऊ ना आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी तयारी लागायला पाहिजे त्यात आपल्या जीवाचे रान करून विधानसभेवर भगवा फडकवू अशा असंख्य बाबिवर साधक बांधक चर्चा या मंथन बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुख मान्यवरानी व्यक्त केल्या.
या बैठकीला शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सागर डबरासे, जिल्हा प्रमुख श्री. देवेंद्र गोडबोले व श्री. उत्तम कापसे, युवासेना कार्यकारनी सदस्य श्री. हर्षल काकडे, महिलासेना जिल्हाप्रमुख सौ. दुर्गाताई कोचे,युवासेना जिल्हा प्रमुख श्री. लोकेश बावनकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख कु. अपूर्वा पितट्टलवार, उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर, विधानसभा सहसंपर्क प्रमुख सूत्तम मस्के, विधानसभा सल्लागार प्रमुख अरुण बनसोड,विधानसभा संघटक रमेश तांदूळकर, जेष्ठ शिवसैनिक रातीराम मामा रघुवंशी,रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे,
पारशिवानी तालुका प्रमुख कैलास खंडार, मौदा तालुका प्रमुख हरिभाऊ लोहबरे,रामटेक महिला तालुका प्रमुख सौ.कलाताई तिवारी रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर, रामटेक तालुका संघटक अनिल येळणे, मौदा तालुका संघटक नरेश भोंदे, कांद्री शहर प्रमुख सुरेश आंबिलडूके, उपतालुका प्रमुख देवराव ठाकरे, देवेंद्र कोहळे,योगेश्वरी चोखांद्रे,प्रमोद बरबटे, प्रकाश निमकर सह मान्यवर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील पक्षाचे रिक्त पद वाटप करून तिन्ही तालुक्यातील असंख्य युवक, महिलांनी पक्ष प्रवेश केला.