Monday, June 24, 2024
spot_img
Homeशिक्षणपार्क साईट ची‌ लेक स्नेहल मनोज मौर्या बारावी परीक्षेत ९१.१७% अव्वल...

पार्क साईट ची‌ लेक स्नेहल मनोज मौर्या बारावी परीक्षेत ९१.१७% अव्वल…

मुंबई – धीरज घोलप

यंदा बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.९५.४४ % मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६०% आहे.पार्क साईट येथील समाज सेवक मनोज मौर्या यांची जेष्ठ कन्या स्नेहल मनोज मौर्या हिला यंदा बारावीच्या परीक्षेत ९१.१७ % गुण मिळालेले आहे. स्नेहल मनोज मौर्या ही पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार असून संपूर्ण पार्क साईट या विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

घाटकोपर राम निरंजन झुंझुनवाला या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून महाविद्यालयांमधून तिसऱ्या क्रमांकावर स्नेहल मनोज मौर्या असुन पार्क साईट च्या कृष्णा क्लासेस मधूनही प्रथम क्रमांकावर आहे स्नेहलची विविध स्तरांमधून सन्मान होत आहे.

Dhiraj Gholap
Dhiraj Gholaphttp://mahavoicenews.com
मी पत्रकार धीरज घोलप, विक्रोळी-मुंबई येथे गेल्या १५ वर्षापासून पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहे. महाव्हॉइस या लोकप्रिय वाहिनी मध्ये गेल्या ५ वर्षापासून मुंबईसारख्या शहरांमध्ये सक्रिय पत्रकारीता करीत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: