मुंबई – धीरज घोलप
यंदा बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.९५.४४ % मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६०% आहे.पार्क साईट येथील समाज सेवक मनोज मौर्या यांची जेष्ठ कन्या स्नेहल मनोज मौर्या हिला यंदा बारावीच्या परीक्षेत ९१.१७ % गुण मिळालेले आहे. स्नेहल मनोज मौर्या ही पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार असून संपूर्ण पार्क साईट या विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
घाटकोपर राम निरंजन झुंझुनवाला या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून महाविद्यालयांमधून तिसऱ्या क्रमांकावर स्नेहल मनोज मौर्या असुन पार्क साईट च्या कृष्णा क्लासेस मधूनही प्रथम क्रमांकावर आहे स्नेहलची विविध स्तरांमधून सन्मान होत आहे.