KKR vs SRH IPL Final: इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. यासह केकेआरने १० वर्षांनंतर पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला. कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 113 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने सहज लक्ष्य गाठले.
व्यंकटेश अय्यरने मॅच विनिंग इनिंग खेळली. त्याने 200 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 3 षटकार आले. अय्यरने छोट्या धावसंख्येसहही तुफानी खेळी सुरूच ठेवली. सुनील नारायणची विकेट लवकर पडल्यानंतर त्याने गुरबाजच्या साथीने डाव सांभाळत संघाला विजय मिळवून देण्यात आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबाद संघाने 18.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 113 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2013 मध्ये मुंबईने चेन्नईला 149 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईला केवळ 125 धावा करता आल्या होत्या. संघाची सुरुवात धक्क्याने झाली. अभिषेक शर्मा दोन धावा आणि ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर हैदराबादची फलंदाजी कोलमडली. राहुल त्रिपाठीने नऊ, एडन मार्करामने 20, नितीशकुमार रेड्डीने 13, हेनरिक क्लासेनने 16, शाहबाज अहमदने आठ, अब्दुल समदने चार, पॅट कमिन्सने 24, जयदेव उंडकटने चार धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार खाते न उघडता नाबाद राहिला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने तीन तर स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 𝗢𝗙 #𝗧𝗔𝗧𝗔𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 😍🏆
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
The 𝗞𝗢𝗟𝗞𝗔𝗧𝗔 𝗞𝗡𝗜𝗚𝗛𝗧 𝗥𝗜𝗗𝗘𝗥𝗦! 💜#KKRvSRH | #Final | #TheFinalCall | @KKRiders pic.twitter.com/iEfmGOrHVp