खलिस्तान समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल याला पंजाब पोलिसांनी शनिवारी दुपारी जालंधरच्या मेहतपूर भागातून अटक केली आहे. यासोबतच त्याच्या सहा साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
पंजाबमधील अनेक भागात इंटरनेट ठप्प
संवेदनशीलता लक्षात घेऊन पंजाब पोलिसांनी 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अनेक भागात इंटरनेट सेवा बंद केली आहे. यामध्ये भटिंडा, फिरोजपूर, मोगा आणि जालंधर या शहरांचा समावेश आहे. काही वेळात सर्व भागात नेट बंद केले जाऊ शकते. मोबाईल सेवाही विस्कळीत होत आहे.
अजनाळा प्रकरणात अटक
अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांच्या 100 गाड्या मागे लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तो नकोदरमध्ये पकडला गेला. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अमृतपालचा व्हिडिओ समोर आला आहे
अमृतपाल सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो कारमध्ये बसलेला आहे. गाडीत बसलेला एक व्यक्ती पोलिस मागे असल्याचे सांगत आहे. त्याचवेळी अमृतपालच्या एका समर्थकाने फेसबुक लाईव्ह केले आहे. पोलिस त्याच्या मागावर असल्याचे तो म्हणत आहे.