Friday, November 22, 2024
HomeदेशKapus Bajarbhav Update | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही देशात कापूस दरात वाढ...भारतात मिळेल...

Kapus Bajarbhav Update | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही देशात कापूस दरात वाढ…भारतात मिळेल का त्याचा फायदा?…वाचा डिटेल्स

अमोल साबळे

Kapus Bajaarbhav Update : जर आपण एकंदरीत कापूस उत्पादनाचा विचार केला तर एकंदरीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर भाव बऱ्यापैकी आहेत. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मागच्या वर्षी जी कापूस पिकाची गत झाली होती तीच गत यावर्षी देखील झाली आहे. मागच्या वर्षी आपण पाहिले होते की झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे कापसाला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळाले होते.

नक्की वाचा:आता शासकीय केंद्रावर शेतीमाल खरेदीत व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला बसणार चाप, वाचा सविस्तर

यावर्षी देखील त्या सारखीच परिस्थिती उद्भवली असून कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे व आता जो काही कापूस काढणीला आला आहे तो परतीच्या पावसामुळे ओला होत आहे. सध्या कापसाचे बाजार भाव 8 ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत असून सध्या कापसाचे प्रत थोडी ओलसरपणामुळे खालावलेली आहे.

जर आपण महाराष्ट्राप्रमाणेच भारताचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकेचा विचार केला तर त्या ठिकाणीसुद्धा कापसाचा हंगाम सुरू झाला असून अमेरिकन कृषी विभागाने याठिकाणी कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज जाहीर केला होता.

सध्या अमेरिकेतील कापसाची स्थिती

अमेरिकेमध्ये देखील दुष्काळ आणि काही ठिकाणी जास्त पावसाचा फटका कापूस पिकाला बसला असून त्या ठिकाणचे टेक्सास हे प्रमुख कापूस उत्पादक राज्य असून त्या ठिकाणी देखील कापूस उत्पादनात मोठी घट येण्याची शक्‍यता अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: