पातुर – निशांत गवई
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त पातुर तालुक्यातील चान्नी येथे पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा, अपघात टाळण्यासाठी सुरक्षा मार्गदर्शन, शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या मातापित्यांचा सन्मान, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा सन्मान, कर्तबगार अधिकारी, कर्मचारी आणि समाजसेवक, कर्तबगार महिलांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन 6 जानेवारी 2023 रोजी सचिवालय सभागृह चान्नी येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील पुरस्कार व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले आणि कर्तबगार अधिकारी कर्मचारी समाजसेवक कर्तबगार महिला यांचा यावेळी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषा संघपाल सोनोने होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मराठी पत्रकार संघाचे अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश सुरजुसे होते तर सौ सुनीताताई अर्जुन टप्पे सभापती पंचायत समिती पातुर, इमरान खान मुमताज खान उपसभापती पंचायत समिती पातुर, विजय चव्हाण ठाणेदार चान्नी, गणेश महाजन पोलीस उपनिरीक्षक चान्नी,
सौ. वर्षा अरविंद पीसोडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अकोला जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना ठाकरे गटाच्या महानगर अध्यक्ष अकोला, अरविंद पिसोडे बसस्थानक प्रमुख अकोला, गणेश सुरजुसे मराठी पत्रकार संघ अध्यक्ष अकोला, देवानंद गहिले अध्यक्ष मराठी पत्रकार संघ तालुका, ज्येष्ठ पत्रकार राजाराम देवकर, पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर लाड, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर, कार्याध्यक्ष तालुका पत्रकार संघ संजय गोतरकार, खरेदी विक्री सोसायटीचे संचालक गजानन पाटील,
सामाजिक कार्यकर्ते कपिल खरप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायणराव अंधारे, पोलीस पाटील महासंघाचे जिल्हा प्रभारी विजय सरदार, युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन इंगळे, राधेशाम राठी अध्यक्ष माजी सरपंच संघटना, जहूर खान लालखान अध्यक्ष पातुर तालुका सरपंच संघटना, प्रेमानंद श्रीरामे, एडवोकेट किरण सरदार, एडवोकेट महेश शिंदे, एडवोकेट संतोष शर्मा, शांताराम ताले सरपंच सायवनी, पंढरी गडदे सरपंच सौ अलका वाहोकर सरपंच पिंपळखुटा आदी मान्यवरांची मंचावर उपस्थित होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात “ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी” या प्रा. करुणा विठोबा गवई यांच्या मधुर आवाजात गीत गायन करून करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले यांनी केले.
या प्रास्ताविक मध्ये त्यांनी ग्रामीण भागात काबाड कष्ट करणाऱ्या आणि जीव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची दखल किती महत्त्वाची आहे हे यावेळी प्रास्ताविकतेमधून व्यक्त करताना महात्मा गांधींची ग्रामस्वराज्याची संकल्पना ही ग्रामीण भागातली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कष्ट करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान आणि कर्तबगार कर्मचारी अधिकारी समाजसेवकांचा सन्मान किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी प्रास्ताविक मधून व्यक्त केले.
तर चान्नी चे ठाणेदार विजय चव्हाण यांनी पत्रकारितेबद्दल सविस्तर माहिती देऊन पत्रकारांच्या कार्याचे यावेळी कौतुक केले तर गणेश सुरजुसे पत्रकार संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा या कार्यक्रमात मार्गदर्शन केले त्यानंतर प्रसिद्ध कवी देवानंद गवई शिर्ला यांनी पत्रकारांचे व्यक्तिमत्व रेखाटलेली कविता गायन करून दाखविली त्यानंतर चान्नीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांचा सत्कार उल्लेखनीय कार्याबद्दल करण्यात आला तर यासोबतच उल्लेखनीय कार्य करणारे कर्तबगार अधिकारी कर्मचारी समाजसेवक शिक्षक त्यामध्ये अनिल नामदेवराव दाते,
अविनाश घुगे वनरक्षक वनविभाग आलेगाव, सौ. वर्षाताई पिसोडे, सौ उर्मिला गाडगे, भारतीताई गाडगे, प्रा. करुणा विठोबा गवई, शीलाताई कांबळे खरात, सौ. राधाबाई बोदडे, श्रीमती सिंधुबाई शेलार, जया राखोंडे, सुनीता ठाकरे, राधेश्याम राठी, नानासाहेब देशमुख, अरविंद पिसोडे, डॉ. शाहिद इकबाल खान, इरफान अहमद शेख,
सय्यद अहमद अकोट, मनोहर सोनोणे, प्रेमचंद शर्मा, पवन सुरवाडे डॉग फाउंडेशन, राजाराम देवकर, विजय सरदार पोलीस पाटील चतारी , नारायणराव अंधारे, जनार्दन हीरळकार, सरपंच जहूरखान लालखान, श्रीमती वंदना ताकझुरे कृषी सहाय्यक, आदींचा पुरस्कार , शाल, श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गायक कलावंत प्रा. करुणा विठोबा गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोहर सोनोणे यांनी केले यावेळी गजानन येनकर, जनार्दन हिरळकर, छगन कराळे, अविनाश पोहरे, राहुल सोनोणे, नंदू बोदडे, अमोल करवते,
दिलीप गिऱ्हे, गोपाल कोळसे, हिम्मत रोकडे, हसन बाबू, दिनकर बोदडे, नामदेव जाधव, पंकज भाकरे, कृषीमित्र मनोहर सोनोने, दशरथ सरदार, प्रवीण सोनोणे, बाबुराव सावंत, त्याचप्रमाणे सामाजिक,धार्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.