Saturday, November 23, 2024
Homeगुन्हेगारीइस्लामपुरातील वृद्धा च्या खुनातील आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २४ तासात केले...

इस्लामपुरातील वृद्धा च्या खुनातील आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २४ तासात केले जेरबंद…

सांगली – ज्योती मोरे.

इस्लामपुरातील पेटकर कॉलनीत राहणाऱ्या हंबीरराव शंकर साळुंखे. वय वर्ष-80. या वृद्धाचा काल रात्री आज्ञातांनी डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, अजित टिके, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना सदर गुन्हा उघड कीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या,

त्यानुसार तपास करत असताना सदरचा खून हा मयताच्या नात्यातीलच विशाल गुलाबराव साळुंखे. वय वर्ष- 24,राहणार- फार्णेवाडी,तालुका-वाळवा यानं केल्याची माहिती मिळाली.त्यानुसार, त्यास पळून जाण्याच्या तयारीने असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फार्णेवाडी ते ताकारी रोड वरून ताब्यात घेतले.

दरम्यान कर्जबाजारी झाल्याने पैशाच्या गरजेपोटी आरोपी विशाल हा हंबीरराव साळुंखे यांच्याकडे पैशाची मागणी करत होता.परंतु हंबीरराव साळुंखे यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने, त्याचा राग मनात धरून डोक्यात जबर मारहाण करून खून केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यात विशाल गुलाबराव साळुंखे या आरोपीस पुढील तपास कामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर,अजित टिके,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सागर टिंगरे, चेतन महाजन ,संदीप नलावडे, सत्यजित पाटील, अभिजीत पाटील, सुनील चौधरी सचिन धोत्रे, कुबेर खोत,संकेत कानडे, पवन सदामते, प्रकाश पाटील,कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: