Friday, July 12, 2024
spot_img
HomeSocial Trendingऔरंगाबाद | रिक्षाचालकाने मुलीला छेडलं...मुलीने घेतली धावत्या रिक्षातून उडी...घटना CCTV कॅमेऱ्यात कैद...

औरंगाबाद | रिक्षाचालकाने मुलीला छेडलं…मुलीने घेतली धावत्या रिक्षातून उडी…घटना CCTV कॅमेऱ्यात कैद…

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आलीय, रिक्षातून जाणाऱ्या एका मुलीची रिक्षा चालकाने छेड काढण्याचा प्रयत्न केला असता घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातूनच उडी टाकली. सदर घटनेनं औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर जखमी झाली असून तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ऑटो रिक्षा चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी क्लासवरुन परतत होती. त्यावेळी रिक्षातून प्रवास करताना रिक्षा चालकाने पीडित मुलीशी अश्लिल संभाषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. भयभीत झालेल्या मुलीनं रिक्षा चालक छेड काढत असल्यानं धावत्या रिक्षातूनच उडी टाकली. यानंतर रिक्षा चालकाने मुलीची मदत करण्याऐवजी तिथून पळ काढला. औरंगाबाद शहरातील शिल्लेखाना चौक ते शिवायी हायस्कूल दरम्यान ही घटना घडलीय.

सदर धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video) कैद झालीय. औरंगाबाद शहरातच घडलेल्या या प्रकराने तीव्र संताप व्यक्त केला जातोय. तसंच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झालाय. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटकही केलीय. सय्यद अकबर सय्यद हमीद असं रिक्षा चालकाचं नाव आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: