Thursday, December 26, 2024
Homeगुन्हेगारीसंतापजनक घटना...बुलढाणा जिल्ह्यात अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार...नराधम अटकेत...

संतापजनक घटना…बुलढाणा जिल्ह्यात अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार…नराधम अटकेत…

न्यूज डेस्क : बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यातील तरवाडी गावात अतिशय संतापजनक घटना समोर आलीय. अडीच वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवून 17 वर्षीय नराधमाकडून बलात्कार करण्यात आलाय. याचबरोबर आरोपी नराधामाकडून कुकर्म करून पिडीत चिमुकलीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या चिमुकलीची प्रकृती सध्या अतिशय गंभीर आहेय. सुरुवातीला बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारसाठी बालिकेला अकोला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आरोपीला बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरवाडी गावात राहणारा 17 आरोपी हा चिमुकलीच्या शेजारी राहतो. या चिमुकलीला हा शेजारी खेळवत असे. काल काही वेळ ती घरी न दिसल्याने घरातील सदस्यांनी तिचा शोध घेतला, त्यावेळी ही चिमुकली आरोपीसोबत गेल्याची माहिती मिळाली, तेव्हा शोध घेतला असता तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचं दिसून आलं. तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. तर काल पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रात्री अकोला रूग्णालयात पिडीत मुलीची व कुटुंबाची भेट भेट घेतली आहे. यावेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राला कालीमा फासणारी ही घटना आहे एका दोन वर्षाच्या चिमूरडीवर 17 वर्षाच्या झाला नराधमानी अत्याचार केलेत मला असं वाटते हा प्रकार म्हणजे मला स्वतःला शॉक बसलात मुलीची कंडिशन फार खराब आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बोरखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका छोट्याशा गावात अत्यंत भयंकर घटना घडली. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न परत ऐरणीवर येत आहेत, अकोल्यात पण अशी घटना घडली मुलीची परिस्थिती अत्यंत वाईट असल्यामुळे तिला शासकीय महाविद्यालय अकोल्यात दाखल करण्याचा मी सध्या आता त्यांच्या नातेवाईकांना भेटलो मुलगी तिच्या डोक्याला पण मार आहे म्हणजे नराधमाने चॉकलेटचा आमिष दाखवून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केलं पाच तास मुलगी घराच्या बाहेर होती आणि नंतर तिच्या डोक्यात वीट सारखा असा दगडी प्रकार काहीतरी मारलेला आहे मुलीला प्रचंड ताप आहे अत्यंत वेदना आहेत मी एका मुलीचा बाप म्हणून सांगतो ही घटना अत्यंत विद्युत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ्याची दखल घ्यावी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ्याची दखल घ्यावी.

पुढे बोलताना म्हणाले, हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावा. आता मी पोलिसांशी संपर्क केला आरोपी अटकेत आहे आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे पण एवढ्यावर हे भागणार नाही तात्काळ जेवढं काही असेल सरकारी वकील एडवोकेट उज्वल निकम यांची नियुक्ती करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: