Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यBreaking Gadchiroli | एटापल्ली तालुक्यात पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांनी गोळी मारून केली हत्या...

Breaking Gadchiroli | एटापल्ली तालुक्यात पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांनी गोळी मारून केली हत्या…

गडचिरोली – एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटलाला नक्षलवाद्यांनी गोळी मारून ठार केले आहे. आज सकाळच्या सुमारास जांबिया आणि अंडगे रोडवर मृतदेह आढळून आला आहे.

हत्या झालेल्या पोलीस पाटलाचे नाव लालसू वेळधा वय 53 असे असून मृतदेहाच्या जवळ नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून सुरजागड चा दलाल व पोलीस खबऱ्या असल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली असे भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी गडचिरोली यांनी टाकलेल्या पत्रकात लिहिले आहे. त्यासोबत राजकीय नेते व पोलीस अधिकाऱ्यांवर सुरजागडखानीच्या समर्थनात काम करतात म्हणून पत्रकात टीका केली आहे.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: