२ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत चालु न झाल्यास आंदोलनाचा प्रवित्रा हाती घेईल – सौ. मिनल नवघरे ( मा.पंस. सदस्या लाखपुरी )
वृत्तसेंवा – अतुल नवघरे
लाखपुरी, ता.१६: मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी या गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणीपुरवठा ८ दिवसापासुन बंद असल्यामुळे गावातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. काल तर मकर संक्रांतीच्या दिवशी पाणीपुरवठा बंद होता.गावालगत वाहणा-या पुर्णा नदी त्या नंदीत अमरावती जिल्हातील येणा-या पेढी नदीच्या दुषित पाणी येते व अमरावती औद्योगिक विकास महामंडळाच्या कारखान्यातील घाणीचे पाणी , शौचालय पाणी , अमरावती शहरातील सर्वच दवाखान्यातील सांडपाणी पेढी नंदीत सोडले जाते.
ती पूर्णा नंदीला मिळते .त्यामुळे पुर्णा नंदी कमालीची दुर्षीत झाले आहे. म्हणुन ते पाणी पिण्या योग्य नाही ते वापरा करिता वापरल्या जाते. त्या पाण्यामुळे तर त्वचारोग , गावात खाज अनेक लोकांना झाली आहे यावर काय उपाययोजना होते याकडे सुद्धा लक्ष लागू आहे .परन्तु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी ३ ते ४ दिवसा नंतर सोडले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे नळाचे पाण्याचे प्रति महिन्याला ३४३ ते ३९५ रुपये मोजावे लागतात. आता तर ८ दिवसापासुन पाणी पुरवठा प्राधिकरणचा बंद आहे त्यामुळे ग्रामस्थाना पिण्यासाठी पाणी वापरासाठी पाणी सुध्दा मिळत नाही गावाच्या फाट्यावर १ किलो मिटर अंतरावर हातपंप आहे.
त्या पिण्याच्या पाण्याच्या हातपंपाजवळ सुद्धा शौच करण्यास येथील नागरिक मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे दुर्गंधी सुद्धा येते नाईलाज त्या हात पंपा जवळून ग्रामस्था व महीला पाणी आणण्याकरिता गर्दी होत आहे संक्रांतीच्या दिवशी सुद्धा पाणी मिळाले नाही ८ दिवसांपासून गावात पाणी टंचाई होत आहे हि एक शोकांतिका आहे याकडे लोकप्रतिनीधी मात्र गप्प बसण्याची भुमिका घेत आहे मात्र लाखपुरी करांना पाणी टंचाईचा फटका बसत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ रोज येत नाहीत . गरिब व मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे, शेतक-याना व सामान्य नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
गावात जागो जागी लिकेंज असुन संडासचे व नालीचे पाणी लिकेंज असल्यामुळे पाईपलाईन मध्ये जात आहे तेच पाणी लोकांना पिण्यासाठी वापरा लागत आहे पाण्यावर थर येत आहे त्याचे फोटो व पाणी शाम्पल सुध्दा ग्रामस्थांनी ठेवला आहे. त्यामुळे रोगराई जास्त प्रमाणात राहते त्यामुळे डायरिंया , पोटांचे विकार , व अनेक आजारे होऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर लिकेंज दुरुस्ती करा व सुरळीत पाणी पुरवठा करा . सद्या ८ दिवसापासुन नळ येत नसल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरि संबंधित विभागाने याकडे लक्ष देवुन प्रश्न निकाली काढावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा मा.प.सदस्या मिनल नवघरे यांनी दिला आहे.
“ प्राधिकरण विभागाने पाणीपुरवठा सुरळीत चालु करांवा व गावातील लिकेंज दुरुस्त कारावे व नियमीत पाणी पुरवठा होणार असे उपाय योजना करावे. हात पंपा जवळ शौचालयास जाणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी जेणे करुण नागरिकांना त्रास होणार नाही “
सौ. मिनल नवघरे ( मा.पंचायत समिती सदस्या लाखपुरी )
गावातील ८ दिवसापासुन पाणी पुरवठा बंद आहे व गावात जागो जागी लिकेज आहे त्यामुळे शौचालय व संडासचे पाणी पाईप लाईन व्दारे पिण्यात येत आहे त्यामुळे आरोग्य बिघडत आहे. तरि संबधित विभागाने पाणी पुरवठा सुरळीत चालु करावा व लिकेंज काढावे .
श्री. माणिक नवघरे ( लाखपुरी ग्रामस्थ )
हायवे चे काम चालू असल्यामुळे पाण्याचे पंप जळल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे.लाखपुरी येथील पाणीपुरवठा १ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
उमाळे साहेब (अभियंता प्राधिकरण विभाग मुर्तीजापुर )
पाणी पुरवठा ८ दिवसापासुन बंद असल्यामुळे घरातील कामे वेळेवर होत नाही हातपंपावरुन पाणी डोक्यावर आणा लागत आहे . तरि पाणी पुरवठा नियमीत करावे .
उमिता नवघरे (गृहिणी)