रामटेक – राजु कापसे
रामटेक: 28 एप्रिल 2024 ला श्रीराम विद्यालय रामटेक येथे विदर्भ वनवासी कल्याण आश्रम जनजाती युवक युवती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मुख्यधापक मिलिंद चोपकर, नगर संघचालक एडवोकेट किशोर नवरे, माजी नगाराध्यक्षा माधुरी उईके, विदर्भ प्रांत संघटन मंत्री रमेश आत्राम,
प्रांत सहसचिव नीताताई किटकरू यांचा प्रमुख उपस्थित झाले। हे प्रशिक्षण 28 एप्रिल ते दोन मे पर्यंत चालणार आहेत. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे आत्मविकास तसेच जनजाती समाजाविषयी माहिती, आपला इतिहास आपली संस्कृती,
अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतील या शिबिरात विदर्भातील अकरा जिल्ह्यामधून 151 प्रशिक्षणार्थी युवक व युवती उपस्थित आहेत 23 कार्यकर्ता व अधिकारी पूर्णवेळ शिबिरात सहकार्य करीत आहेत.