Tuesday, July 16, 2024
spot_img
HomeBreaking NewsAmravati | माय लेकाच्या हत्याकांडाने हादरला मंगलधाम परिसर…अवघ्या दोन तासात हत्यारा केला...

Amravati | माय लेकाच्या हत्याकांडाने हादरला मंगलधाम परिसर…अवघ्या दोन तासात हत्यारा केला जेरबंद…

हल्ल्यात वडील गंभीर जखमी

Amravati | खुल्या भूखंडाच्या वादावरून दोन शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात आज सायंकाळी अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगर येथे शेजाऱ्याने घरात शिरून आई व मुलावर सब्बल ने हल्ला करून हत्या केली. तर मध्यस्ती करण्यासाठी गेलेले वडील या घटनेत गंभीर जखमी झाले आहे. लोणारे व देशमुख कुटुंबियात गेल्या अनेक वर्षांपासून खुल्या भुखांडावरून वाद सुरू होता. आज पुन्हा याच विषयावरून दोन कुटुंबात वाद झाला. याच रागातून आरोपी देवानंद लोणारे याने विजय देशमुख यांची पत्नी आणि मुलावर सब्बलने हल्ला केला. जेव्हा विजय देशमुख मध्यस्थी करण्याकरता पोहोचले तेव्हा त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांची पत्नी आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय देशमुख हे गंभीर जखमी आहे.

घटनेची माहिती मिळताच डीसीपी सागर पाटील यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले व घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांकडून घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून फुटेज घेतल्या जात आहे. पोलिसांनी फरार आरोपी देवानंद लोणारे याचा शोध घेतला असून आरोपीला अवघ्या दोन तासात चोर माऊली येथून जेरबंद केले आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेले विजय देशमुख यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: