Wednesday, November 6, 2024
Homeगुन्हेगारीमुर्तिजापुर शहरात रात्री चोरट्यांचे राज्य...पोलीस स्टेशनच्या समोरचे दुकान चोरट्यांनी फोडले...

मुर्तिजापुर शहरात रात्री चोरट्यांचे राज्य…पोलीस स्टेशनच्या समोरचे दुकान चोरट्यांनी फोडले…

मुर्तिजापुर शहरात सुरू असलेला चोरट्यांचा उच्छाद थांबण्यास तयार नाही. आतापर्यंत चोरीच्या दोन तीन घटना घडल्या असून काल मध्यरात्री चक्क शहर पोलिस ठाण्यापासून १०० मीटरवर मुख्य रस्त्यावरील दुकान चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. शहरातील चोरट्यांची दहशत अधोरेखित करून दिली आहे. या चोऱ्या रोखण्यात शहर पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत.

शहरात कायद्याचे की चोरांचे राज्य आहे हे जनतेला कळेनासे झाले असून जनता हैराण झाली आहे. एका व्यावसायिकाला मारहाण करून लूटमार केल्याची घटना घडल्यानंतर मोटरसायकल चोरीची घटना घडली.त्यानंतर दिनांक १३ च्या रात्रीतून येथील शहर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर शंभर फूट अंतरावर असलेल्या दुकानातून चोरट्यांनी शटर फोडून चोरी करत ठाणेदारांनाच आव्हान दिले आहे.कारण ठाणेदारांनी नुकतेच आपल्या स्वतःचा उदो उदो करून घेण्याचा प्रयत्न करत चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याचे आव्हान दिले होते. ते आव्हान किती पोकळ होते यावरून दिसून येते. चोरट्यांना पोलिस आणि कायद्याची कुठलीही भिंती दिसून येत नसून बिनधास्तपणे शहरात एका मागून एक घटना घडत असल्याने आता शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहे.

अवैद्य व्यवसायासह इतर सर्व काही व्यवस्थित सुरू असून चोऱ्या,घरफोड्या, मोबाईल चोरी,अवैध गुटख विक्री, रस्त्याने अडवून लुटमार,बस स्थानकावरील प्रवाशांच्या साहित्याच्या चोऱ्या मात्र का बंद होत नाहीत ? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात असून याकडे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष असू नये याला काय म्हणावे.
शहर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेले दुकानच चोरट्यांनी फोडले आहे. सोमवारी १३ मेच्या रात्री ही घटना घडली. सदर घटना दि.१४ रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. या चोरीत चोरट्यांनी अंदाजे नगदी ३ लाख ८३ हजाराची ऐवज लंपास केला आहे.

भर रस्त्यावर रात्री चोरट्यांनी व्यावसायिकाला दीड लाखाने लुटल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधीच्या अनेक चोरीच्या घटनेमुळे मूर्तिजापूरकर त्रस्त आहे. त्यातील एकाही प्रकरणाचा छडा पोलिसांना लावता आला नाही. त्यातच आता पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच चोरीची घटना घडल्याने शहरवासीयांच्या आणि व्यापाऱ्यांच्या भीतीत आणखी भर पडली आहे.पोलीस प्रशासनाकडून चोरट्यांपासून दिलासा मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

याबाबत प्राप्त माहिती नुसार न्यायालयासह उपविभागीय अधिकारी कार्यालया,तहसील, व पंचायत समिती कार्यालय असलेल्या मुख्य रस्त्यावर शहर पोलीस स्टेशनच्या समोरासमोर असलेल्या ठाकूर बोअरवेल्स अँड हार्डवेअर च्या दुकान मालक उदयसिंह पोहरसिंह राजपूत हे १३ मे च्या रात्री ९ः३० वाजता आपले काम आटपून दुकान बंद करून घरी निघून गेले.रात्रीची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून शटल उचकटून व्यवसायातून आलेले सुमारे ३ लाख ८३ हजारांवर रोख स्वरूपातील नगदी चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.

शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली असल्याचे सांगितल्या जात असताना चोरट्यांनी अगदी पोलीस स्टेशनच्या समोरच दुकान फोडून गस्तचे पितळ उघड केले आहे.चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. यामध्ये एकूण ४ ते ५ चोरटे असल्याचे समजले. सकाळी चोरी झाल्याची घटना उघडकीस येताच प्रभारी पोलीस निरीक्षक ए.के. वडतकर यांनी पोलीस स्टॉपसह घटनास्थळाकडे धाव घेतली. अकोला येथून श्वान पथक व तसे तज्ञ पथकास पाचरण करण्यात आले होते. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: