जलालखेडा, खडकी, मुक्तापुर, मदना, भारसिंगी, चांदणीबर्डी, मेहद्री, खेडी खरबडी, मेंढला, सिंजर,दातेवाडी, वडविहरा, करणंजोली, थडीपवणी, अंबाडा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट. नरखेड तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह, पाऊस व गारपीट, गुरवारी 4.30 च्या सुमारास गारपीट ला सुरवात.,गहू, पाले भाज्या व फळबागेचे मोठे नुकसान.
- वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल, झाडे कोसळली
- काहीकाळ विद्युत प्रवाह खंडित.
- आब्यांचे मोठे नुकसान.
- गव्हाचे पीक जमीनदोस्त.
नरखेड – अतुल दंढारे
गुरुवारी दुपारी 4.30 च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट कुठे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गहू , फळभाज्या, फळबागा व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे झाडे कोसळली, विद्युत पोल व तारा तुटल्यामुळे जलालखेडा येथील विद्युत प्रवाह काही काळ खंडित होता.
गहू जमीन दोस्त झाला तर भाजीपाल्याचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुसान झाले असून आधीच शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून त्यात आलेल्या आवकली पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
जलालखेडा, खडकी, मुक्तापुर, मदना, भारसिंगी, चांदणीबर्डी,मेहद्री, खेडी खरबडी ,मेंढला, सिंजर, दातेवाडी, वडविहरा, करजोली, थडीपवणी, अंबाडा, जामगाव, लोहारी सावंगा तसेच आजूबाजूच्या इतरही गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाले. त्यामुळे शासनाने त्वरित शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेले करताना शेतकऱ्याचे नुकसान गारपीट व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मी माझ्या शेतात गोबीची लागवड केली असून गारपीटीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे फळबागा,गहू व इतर पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोठीराम चाफेकर शेतकरी मेंढला(वाढोणा)
.