नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करुन गोंधळ करणारे, रस्त्यावर बसुन मद्य सेवन करुन असभ्य वर्तन करणारे इसमाविरुध्द विशेष मोहिम राबवुन कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शहरातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशीत केले होते.
त्यानुसार पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने नांदेड शहरात दिनांक 14 मे रोजी सायंकाळी विशेष मोहीम राबवुन नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, बार समोर, हॉटेलसमोर, देशी दारु दुकानसमोर, मद्य सेवन करणारे तसेच मद्यसेवन करुन गोंधळ करुन, असभ्य वर्तन करणारे एकुण 127 इसमांविरुध्द शहरातील पोलीस ठाणे पथकाकडुन तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाकडुन कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे.
नांदेड शहरातील सर्व देशी व विदेशी दारु विक्री करणारे दुकान मालकांना पोलिसांनी इशारा दिला असून त्यांनी आपले दुकानसमोरील रस्त्यावर कोणत्याही परीस्थीतीमध्ये कोणीही इसम मद्य सेवन करणार नाही असे मद्य सेवन करुन असभ्य वर्तन करणार नाही. तसे निदर्शनास आल्यास संबंधीत दुकान मालकाविरुध्द योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असा ईशारा दिला आहे