Saturday, July 13, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीमालेगांव पंचायत समितीत गोंधळ घालणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल...

मालेगांव पंचायत समितीत गोंधळ घालणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल…

वाशिम (मालेगांव) – चंद्रकांत गायकवाड

पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालुन शिवीगाळ करणाऱ्या पांगरी धनकुटे येथील दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मे रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास घडली.

मालेगांव पंचायत समितीचे सभापती बाळकृष्ण आनंदराव अवघन वय ५६ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 14 मे रोजी दुपारी मी पंचायत समिती कार्यालयात कर्तव्यावर हजर असताना तिथे पंचायत समितीचे कर्मचारी मधुकर तनमने , दिलीप देवकते ,प्रकाश काकडे व गजानन इंगोले हे कर्मचारी उपस्थित होते.

दुपारी ३ वाजता चे सुमारास वरील कर्मचाऱ्यांच्या सह मी माझ्या कार्यालयात हजर असताना त्या ठिकाणी रवींद्र साहेबराव कदम व 24 वर्ष व महादेव काशीराम अखंड वय 22 वर्षे दोन्ही राहणार पांगरी धनकुटे तालुका मालेगाव हे दोन इसम माझ्या कार्यालयात आले व त्यांनी त्यांच्या पांगरी धनकुटे गावांमध्ये काम केलेल्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या बिल संदर्भात विचारणा केली.

त्यावेळेस त्यांचे मोबाईल मध्ये एक जण शूटिंग काढू लागला. तेव्हा मी त्यांना म्हटले की संबंधित बिल हे ग्रामपंचायत पांगरी धनकुटे कार्यालयाशी संबंधित असून त्याबाबत तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा करा .असे म्हटल्याबरोबर त्या दोघांनी तुम्ही कार्यालयात काय करता तुमचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण नाही का ?

असे आरडाओरडा करून अरेरावी भाषेत मला व इतर कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तेव्हा कार्यालयातील उपस्थित कर्मचारी निलेश तनमने , दिलीप देवकते, प्रकाश काकडे गजानन इंगोले यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी निलेश तनमने यांच्या अंगावर जाऊन कॉलर धरून लोटलाट केली व तुम्ही कार्यालयात कसे काय काम करता ते पाहतो. अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

अशा प्रकारे प्रकारच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये सदर दोघाविरुद्ध कलम 353 294 506 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत .

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: