Sunday, December 22, 2024
Homeराज्यलाखपुरी येथे श्री च्या भक्ताचा उसळला जनसागर...

लाखपुरी येथे श्री च्या भक्ताचा उसळला जनसागर…

श्री .गजानन महाराज संस्थान लाखपुरी येथे प्रगट दिनानिमित्त श्री च्या दर्शनास हजारो भाविकांची गर्दी…

वृत्तसेवा – अतुल नवघरे

लाखपुरी – मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे श्री .गजानन महाराज संस्थान लाखपुरी येथे प्रगट दिनानिमित्त श्रीच्या दर्शनास हजारोच्या वर भाविकांची गर्दी जमली होती. सकाळी ५ ते ६ वाजता पासून काकडा आरती त्या नंतर श्री च्या दर्शणार्थ भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्री भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला होता. सकाळी श्रींना महाभिषेक आरती करण्यात आली त्यानंतर श्री च्या मुखवटा व पादुकांची नगर प्रदक्षिणा पार पडली.

तदनंतर सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संतोषमहाराज सखारमपुरकर यांचे काल्याचे किर्तन पार पडले . प्रगट दिन उत्सवासाठी यावेळी मंदिरावर अनेक ठिकाणच्या पालख्यांचे आगमन झाले होते. श्रीच्या प्रकट दिन ठरला अन्नपूर्णा उत्सव श्री संत गजानन महाराज संस्थान लाखपुरी येथून मिरवणूक निघाल्यानंतर अनेक सेवाभावी मंडळ संस्था , संघटना यांनी चहा फराळ महाप्रसादाचे आयोजन केले होते. गजानन महाराज संस्थान द्वारा यावेळी भाविकांची श्री च्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

महाप्रसाद संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होता. महाप्रसादासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा बघता यंदा श्रीच्या प्रगट दिन उत्साह अन्नपूर्णा उत्सव ठरत असल्याचे चित्र दिसत होते. संध्याकाळी ६ वाजता पासून श्रीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती‌ . मिरवणुकी दरम्यान विविध मंडळांनी पथनाट्य , भजने , गवळण , विविध भक्ती गीते , असे विविध देखावे यावेळी भाविकांना पाहण्यास मिळाले.

या वेळी लक्षेश्वर ढोल मंडळ , लक्षेश्वर महिला वारकरी भजन मंडळ लाखपुरी ,लक्षेश्वर हरिपाठ मंडळ , भुजवडा येथील ढोल मंडळ , शिंगनापूर ढोल मंडळ , इत्यादी मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला होता.महाराणा प्रताप मंडळ लाखपुरी व नवदुर्गा तरुण उत्साही मंडळ लाखपुरी व गावातील मंडळांन कडुन चहाची व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती , कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गजानन महाराज संस्थान लाखपुरी येथील भक्तगण व समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: