Saturday, November 23, 2024
HomeMarathi News Todayअकोल्यात शेतकरी संघटनेने कांदा जाळून केली होळी!.....

अकोल्यात शेतकरी संघटनेने कांदा जाळून केली होळी!…..

दिनांक 7

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने आज होळीच्या दिवशी केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज अकोला जिल्हाधकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने कांद्याची होळी करून आंदोलन केले सरकार समस्या क्या सुलझाए सरकार येहि समस्या है या प्रमाणे शेतकऱ्यांच्या भाव वाढवण्याऐवजी भाव पाडण्याची मोहीमच राबवली आहे.

त्याचाच फटका आज कांद्याला व इतर शेत मालाला बसला आहे सरकारच्या निर्यातीच्या बाबतीतले धरसोड धोरण याला कारणीभूत आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मनमानी कारभारामुळे देशाने निर्यातीच्या बाबतीत पत गमावली आहे.

आता निर्यात खुली असली तरी कोणताही देश आपल्या देशावर विश्वास ठेवायला तयार नाही म्हणून निर्यात बंद झाली आहे त्याचा मोठा फटका देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे कांदा माती मोल झाला म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे लग्न मोडलीत अनेकांना आपल्या मुला मुलींची शिक्षणे अर्ध्यावर सोडावी लागली आहेत हे सर्व सरकारच्या चुकीच्या शेती धोरणनांचे परिणाम असल्याचने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

सरकार विरोधात घोषणा देऊन कांद्याच्या होळीचे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे विलास ताथोड,अविनाश नाकट,डॉ निलेश पाटील,बळीराम पांडव,शंकर कवर,अजय गावंडे,सतीश उंबरकर,मयूर जोशी,योगेश थोरात आणि इतर शेतकरी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: