पातुर – निशांत गवई
दिनांक ०१ मार्च २०२४ रोजी आर्यन विवेक अलोने वय १९ वर्षे रा. डाबकी रोड अकोला हा १ मार्च रोजी अकोला येथुन पातूर रोडने येत असतांना त्याचा मोबाईल हॅन्डसेट १०/३० वा.चे सुमारास रस्त्याचे कडेला जुने बसस्टॅन्ड पातूर येथे अॅटो स्टॅन्डचे कडेला रिंग वाजत असतांना मिळुन आला सदर मोबाईल हॅन्डसेट ६०,०००/-रुपये किमंतीचा असुन आयफोन आहे.
सदर मोबाईल हा कच-यामध्ये वाजत होता. तेथे उपस्थित कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदर योगेश गेडाम ब.नं. ५८१ पो.स्टे. पातूर यांना मिळुन आला तो मोबाईल घेवुन त्यांनी ठाणेदार किशोर शेळके यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहीती दिली त्या मोबाईलवर मुळ मालक आर्यन विवेक अलोने याचे फोन येत होते ते फोन ठाणेदार यांनी रिसीव्ह करुन तुमचा फोन पातूर पोलीस स्टेशन येथे आहे.
तुम्ही कागदात्रांची पुर्तता करुन फोन घेवुन जाण्या बाबत सांगीतले वरुन ०५/०० वा. चे सुमारास आर्यन विवेक अलोने यांनी कागदपत्राची पुर्तता करुन ठाणेदार श्री किशोर शेळके यांचे उपस्थित पोहेकॉ योगेश गेडाम एएसआय अरविंद पवार, वसंता राठोड, रेखा तोडसाम यांचे समक्ष मोबाईल हॅन्डसेट त्यांचे सुपुर्द करण्यात आलेला आहे.
पातूर पोलीस स्टेशन कडुन असे आव्हान करण्यात येते की यापुढे नागरिकांना मोबाईल हॅन्डसेट मिळुन आल्यास पो.स्टे. आणुन जमा करावे. पोलिस निरीक्षक, किशोर शेळके पातूर