Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यआगामी ७ मार्चला सड़क अर्जुनी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा...

आगामी ७ मार्चला सड़क अर्जुनी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा व किसान सम्मेलनाची पूर्व नियोजित बैठक गोंदिया येथे संपन्न…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

एन एम डी महाविद्यालय गोंदियाच्या ऑडिटोरियम हॉल मध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजनात्मक बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, प्रेमकुमार रहांगडाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यात आगामी ७ मार्च ला सड़क अर्जुनी येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा व किसान सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माननीय उपमुख्यमंत्री अजीतदादा पवारजी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल पटेल व माननीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेजी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार व मनोहर पर्वाचा प्रारंभ यानिमित्याने आज आयोजित बैठकीत कार्यक्रमाची तयारी, पक्ष संघटन व बूथ कमेटीच्या बाबतीत सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष व सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

आगामी ७ मार्च ला होणाऱ्या कार्यक्रमाच्या भव्य तयारी व यशस्वीतेबाबत सर्वांनी योग्य नियोजन व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोबत घेवून येण्याची जबाबदारी घ्यावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार प्रफुल पटेल यांची राज्यसभेवर निर्विरोध निवड झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

खासदार प्रफुल पटेल सदैव जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार – राजेंद्र जैन

कार्यकर्ता मजबूत तर नेता मजबूत बूथ मजबूत तर पक्ष मजबूत हा दृष्टीकोन बाळगून कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीची प्रक्रिया निरंतर ठेवावी महिला व युवा वर्गामध्ये उत्सव निर्माण करावा. खा.श्री प्रफुल पटेलजी राज्यसभेवर निर्विरोध निवडून आल्याने विकासाच्या बाबतीत कुणीही मनात शंका निर्माण करू नये.

जिल्ह्यातील सिंचनाच्या सोयी, शेतकऱ्यांना बोनस, रेल्वेचे जाळे, रोजगार, वैद्यकीय महाविद्यालय आणि पायाभूत सुविधा याबाबतीत नेहमी अग्रेसर राहिले आणि भविष्यात सुद्धा श्री पटेलजी सदैव जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार. तसेच आगामी ७ मार्च ला जिल्हयातील पदाधिकाऱ्यानी नियोजन करून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनासोबत उपस्थित राहावे असे आवाहन केले.

कार्यकर्त्यांचा संघर्ष व ताकत हीच पक्षाची जमेची बाजू आहे. पक्ष बांधणी कडे लक्ष द्या अन्यथा पक्ष कमजोर होतो बूथ कमेटी शिवाय पर्याय नाही. आगामी कार्यकर्ता बैठकीला सर्वांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावे व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना मेळाव्याला आणण्याचे काम करावे असे आवाहन आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

यावेळी सर्वश्री विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, अजय लांजेवार, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, किशोर तरोणे, योगेंद्र भगत, गणेश बरडे, रफिक खान, डी यु रहांगडाले, मोहन पटले, सुरेश हर्षे, अविनाश काशिवार, कुंदन कटारे, केवल बघेले, लोकपाल गहाणे, सी.के.बिसेन, अजय उमाटे, विशाल शेंडे, पूजा अखिलेश सेठ, यशवंत गणवीर, अशोक सहारे, नानू मुदलियार, घनश्याम मस्करे, नीरज उपवंशी, शंकरलाल टेम्भरे, अखिलेश सेठ, माधुरी नासरे,

अश्विनी पटले, रजनी गौतम, राजकुमार एन जैन, कृष्णकुमार बिसेन, विनीत सहारे, कुंदा दोनोडे,आशा पाटील, कीर्ती पटले, कल्पना बहेकार, मनीषा चुटे, लता रहांगडाले, मोनिका सोनवाने, शर्मिला पाल, उषा मेश्राम, वंदना पटले, लक्षमी आंबाडरे, रविना पाठारे, जया खंडेलवाल, रुचिता चौहान, अनिता चौरावार, सुनीता सोनवाने, सुनीता डोहारे, रवीकुमार पटले, दानिश साखरे, राकेश जयस्वाल, सचिन भाडारकर, नितीन टेम्भरे, करण टेकाम, हरिराम आसवानी,

गोपीचंद थवाणी, राजू गौतम, रिताराम लिल्हारे, चंदन गजभिये, प्रशांत बघेले, राजेश भक्तवर्ती, विनायक शर्मा, सुरेंद्र रहांगडाले, सागर गावरानी, सौरभ उके, मुकेश पाचे, अतुल शेंडे, संजीव राय, भुवन हलमारे, युवराज बिसेन, वीरेंद्र इलपाते, प्रतीक पारधी, मनोज हेमने, योगेश डोये, बाबा बहेकार, जितेंद्र चुलापर, रोहित कोरोटे, पुरान उके रमेश कुरील, गुणवंत मेश्राम, पिंटू तिजारे, श्रावण मेंढे, बबलू कांबळे, प्रकाश नेवारे, माणिक टेम्भरे, पी एम मेश्राम, पियुष झा,

पवन पटले, वीरेंद्रजी, संदीप मेश्राम, शिवलाल नेवारे, राजेश रामटेके, लक्षमिकांत चिखलोंडे, टी एम पटले, राजेश तुरकर, विजय रहांगडाले, मायकल मेश्राम, गगन छाबडा, ओमप्रकाश लांजेवार, चुन्नीलाल सहारे, भागवत फरकुंडे, युनूस शेख, झणकलाल ढेकवार, चंद्रकुमार चुटे, आर के जांभुळकर, आरजू मेश्राम, अजय सहारे, राजकुमार प्रतापगडें, राजू येडे, सुनील कापसे, भास्कर कोठेवार, खुशाल वैद्य, श्याम फाये, गंगाराम बावनकर, नागो बन्सोड, रवींद्र चौधरी,

बबलू बिसेन, रवी सोनवाने, अनिल खरोले, मंगेश रंगारी, सुजित अग्रवाल, कैलास भेलावे, हरीश पनापलीय, उद्धध्व मेहंदळे, दीपक गायधने, भागेश बीजेवार, मनोज बीजेवार, रौनक ठाकूर, कान्हा बघेले, गौरव शेंडे, तिलक भांडारकर, हेमराज हरिणखेडे, प्रीतम मोटघरे, खुमेश मेश्राम, राजेश्वर रहांगडाले, आर के उके, चुंनीलाल सहारे,

पंकज फुलके, रामंदजी ठाकरे, सुनील ब्राह्मणकर, शुभाष यावलकर, बाबा बहेकर, सुनील पटले, शैलेश वासनिक, दिनेश गोडसेलवार, अजय शहारे, शुभम उजवणे, पुरुषोत्तम बावनकर, वामन गेडाम सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: