Hardik Pandya: IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या या वेळी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने एक विजय मिळवला मात्र तरीही संघाचा त्रास कमी झालेला नाही.
आता हार्दिक पांड्याच्या भावाला स्पर्धेदरम्यान अटक करण्यात आली आहे. क्रिकेटरची फसवणूक केल्याप्रकरणी हार्दिकच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. मात्र, खुद्द हार्दिकने याबाबत तक्रार केली होती.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. वास्तविक, वैभव पांड्याला त्याच्याच सावत्र भावांची 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आढळले आहे.
Economic Offence Wing of Mumbai police have arrested Vaibhav Pandya, stepbrother of cricketer Hardik Pandya; for allegedly cheating them of around Rs 4 crore in business: Mumbai Police
— ANI (@ANI) April 11, 2024
Vaibhav allegedly diverted around Rs 4.3 crore from the partnership firm, causing a loss to…
वास्तविक, वैभवसोबत हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचीही एका व्यवसायात भागीदारी होती. ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल यांचा 40 टक्के तर वैभवचा 20 टक्के वाटा होता.
खरे तर हा नफा प्रत्येक व्यक्तीच्या या व्यवसायातील सहभागानुसार वाटून घ्यायचा होता. मात्र वैभवने हे केले नाही. कंपनीचा नफा आपल्या भावांना देण्याऐवजी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून ती त्याच्याकडे हस्तांतरित करून व्यवसायाच्या भागीदारी कराराचा भंग केला.
त्यानंतर हार्दिक आणि कृणालने 4.3 कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले. एवढेच नाही तर कुणालाही न सांगता वैभवने या भागीदारीतील नफ्यातील हिस्सा 20 टक्क्यांवरून 33.3 टक्के केला होता.
वास्तविक, हार्दिक पांड्याने स्वतः वैभव पांड्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने वैभव पांड्याला अटक केली. यानंतर न्यायालयाने वैभवला पोलीस कोठडी सुनावली.