Wednesday, July 24, 2024
spot_img
HomeBreaking NewsAshok Tanwar । भाजप उमेदवाराला जनतेने धुडकावून लावत गाडीवर केली दगडफेक…पहा व्हिडीओ

Ashok Tanwar । भाजप उमेदवाराला जनतेने धुडकावून लावत गाडीवर केली दगडफेक…पहा व्हिडीओ

Ashok Tanwar: देशात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास सुरुवात केली आहे. भाजपने हरयाणा राज्यातील लोकसभेच्या 10 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सिरसा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या यादीत अशोक तंवर यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रचारासाठी एका गावात गेले असता तेथे जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. तवर यांचा ताफा नागरिकांनी अडवत त्यांच्या गाडीवर दगडफेकीत गाडीचे काच फुटले मात्र सुदैवाने कोणतेही हानी झाली नाही.

अशोक तन्वर यांच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडिओ विरोधात तन्वर यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी अनेकांच्या नावाने तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये आप, काँग्रेस आणि INLD पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही नावे आहेत.

अशोक तंवर हरियाणात मोठा दलित चेहरा बनला आहे. त्यांना संघटना आणि निवडणूक व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात असताना सिरसामधून खासदार झाले, त्यानंतर त्यांनी सिरसातून तीन निवडणुका लढवल्या, पण विजय मिळवला नाही. दीर्घकाळ राजकारणात सक्रिय असल्याने त्यांचा अनेक जागांवर प्रभाव आहे. एक प्रभावी आणि उत्साही नेता आहे. तरुणाईसह सर्वच वर्गांमध्ये त्यांचा प्रभावी प्रवेश आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: