पातूर – निशांत गवई
पातूर – स्थानिक पंचायत समिती अनेक दिवसा पासून वादग्रस्त ठरत असून या ठिकाणी अनेक नागरिकांना समस्याना तोंड द्यावे लागत असून आज रोजी गटविकास अधिकारी यांना सुद्धा आपले दालन सोडून पळ काढावा लागला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि शासकीय पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी मोरे याची प्रभारी नियुक्ती मागील महिन्यात झाली परंतु गटविकास अधिकारी हेच पंचायत समिती मध्ये हजर नसल्याने पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांवर कुठलाही धाक रहला नाही त्यामुळे अधिकारी हे मनमानी कारभार सुरु आहे.
त्यामुळे आपल्या कामासाठी खेडेगावातुन आलेले नागरिकांना दिवसभर या अधिकाऱ्यांच्या सही साठी किंवा दुसऱ्या कामासाठी या ग्रामस्थांना तात्काळत राहावे लागते अधिकारी हजर जरी असेल तरी सुद्धा नागरिकांना अनेक समस्याशि सामना करावा लागत असून याच नागरिकांच्या समस्याना वाच्याता फोडण्यासाठी सत्ताधारी असलेल्या वंचित च्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी आज आले असता त्यांच्या दालन मध्ये जाऊन त्यांना ग्रामस्थ यांच्या समस्या तथा पदाधिकारी यांच्या मनमानी कारभार बाबत, माजी उपसभापती अर्चनाताई डाबेरावयांनी आक्रमक होत सर्व प्रथम जाब विचारला यावेळी वंचित चे अर्जुन टप्पे,राणा डाबेराव,शरद सुरवाडे, चंद्रकांत तायडे राहुल सुरवाडे आदी. नि जाब विचारला असता गटविकास अधिकारी मोरे यांनी बेजवाबदार उत्तर देऊन तुम्ही माझ्या खुर्ची वर बसा असे म्हणून दालन सोडून पलायन केले मात्र वंचित च्या पदाधिकारी यांनी त्यांना दालन बाहेर गाठून त्यांना जाब विचारला मात्र त्यांनी जाब न देता त्या ठिकाण वरून निघून गेले सदर घटना मात्र हजारो लोकांनी पाहिली तथा अनेकांनि आपल्या मोबाईल मध्ये व्हीडिओ शूटिंग सुद्धा काढली असून या घटनेची खमंग चर्चा पंचायत समिती परिसरात सुरु होती.
गटविकास अधिकारी यांना वंचित च्या पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या समस्या तथा अधिकाऱ्यांनी केलेल्या मनमानी कारभार बाबतीत विचारणा केली असता त्यांनी त्या ठिकाण वरून पळ काढून काही अंतर वर जाऊन काही पदाधिकारी यांच्या फाईल वर सह्या केल्या असल्या चि सुद्धा माहिती आहे.
पातूर पंचायत समिती मध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना करिता थम मशीन लावलेली असून या थम मशीन चा उपयोग फक्त शिक्षण विभागातील बोटावर मोजणारे अधिकारी करत असून या थम मशीन चा वापर बाकीचे सर्व अधिकारी मनमानी पद्धतीने करीत असल्या चि चर्चा सुद्धा पंचायत समिती च्या प्रांगण मध्ये सुरु होती.
तालुक्यातील नागरिकांच्या समस्या आमच्या पर्यंत येतात त्या समस्या बाबतीत आम्ही गट विकास अधिकारी मोरे यांना जाब विचारला असता त्यांनी दालन सोडून जायचं नव्हते तर समस्या चे निवारण करायला हवे होते इम्रानभाई उप सभापती
कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचि बेशिस्त खपवून घेतल्या जाणार नाही सौ.मनीषा अजय ढोणे प, स. सदस्य
वंचित ची सत्ता असूनही अधिकारी मनमानी कारभार करत असतील तर तो खपवून घेतल्या जाणार नाही त्यांनी तत्परतेने जनतेचे काम न केल्यास दप्तरी दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार:- शरद सुरवाडे महासचिव वंचित पातुर
गटविकास अधिकारी मोरे यांना वेळोवेळी फोन करून नागरिकांच्या समस्या बाबतीत सांगितलं आज गट विकास अधिकारी आले असता बेजबदार उत्तर देऊन पळ काढला सौ. अर्चनाताई डाबेराव प. स. सदस्य