पातूर – निशांत गवई
पातुर शहराला अर्धा भाग असलेल्या शिरला ग्रामपंचायत मध्ये असून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक गजानन डिवरे यांना उपस्थित राहण्याची गरज असून शहरात येऊन केवळ बिलांवर सह्या करून आपले कामकाज पूर्ण करणाऱ्या ग्रामसेवकाला सर्वसामान्यांच्या कामाकरिता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याची ऍलर्जी असून विविध कामाकरिता सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात गेला.
असता त्या ठिकाणी ग्रामसेवकासह इतर कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना तासंतास कार्यालयासमोर ताटकळत उभे राहावे लागत असून शिरला येथील ग्रामसेवक कारभाराला सर्वसामान्य नागरिक कंटाळले असून केवळ सर्वसामान्य फंड किंवा 15 वित्त आयोगातून दिले काढून स्वतःचे काम पूर्ण झाले समजणाऱ्या ग्रामसेवकाला सर्वसामान्याचे काम करण्याला वेळ मिळणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पातूर शहरातील अर्ध्यापेक्षा भाग हा जिल्हा ग्रामपंचायत असल्याने नगरपरिषद तालुका या ग्रामपंचायतची आर्थिक उत्पन्न असल्याने ग्रामपंचायतचा कारभार घेण्याकरिता अनेक ग्रामसेवक हे उत्सुक असतात पातुर शहरातील विविध व्यावसायिकासह अनेक मोठ्या इमारतींचे कर वसुली सह मोठ्या प्रमाणात आर्थिक स्त्रोत असल्याने या ग्रामपंचायतीकडे अनेकांचा डोरा आहे.
या ग्रामपंचायतीला गेल्या काही दिवसा अगोदर वादग्रस्त ग्रामसेवक रुजू झाले आहेत ग्रामपंचायत मधील सर्वसामान्यांचे कामे करण्याची जबाबदारी ग्रामसेवकासह कर्मचारी असल्यास सुद्ध अनेक वेळा या कार्यालयाला कुलूप असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून सर्वसामान्य ची कामे करण्यापेक्षा अतुल शहरातील एका विशिष्ट कार्यालयात बसून सर्वसामान्य फळ किंवा 15 वित्त आयोगातील विविध कामांची बिले काढून दिवसभर गायब राहणाऱ्या ग्रामसेवक डिवरे यांच्या कारभाराला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय शिरला येथील अनेक वेळा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी काम करता गेले असता कार्यालयाला कुलूप दिसल्याने कर्मचाऱ्यांची किंवा ग्रामसेवकाची वाट पाहत नागरिकांना उपस्थित राहावे लागत आहे बुधवारी सकाळी पातुर शहरातील वीस ते पंचवीस नागरिक विविध कामाकरिता ग्रामपंचायत कार्यात गेले असता दुपारी बारा वाजेपर्यंत या कार्यालयाला खूप असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य सागर कडून यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कार्यालय उघडून नागरिकांचे कामे करण्याकरिता सूचना केल्या यानंतर या नागरिकांचे कामे झाले असल्याची माहिती आहे.
यावरून शिरला ग्रामपंचायतचा कारभार केवळ लाखो रुपयांची बिले काढण्यापुरताच मर्यादित राहत असल्याचे बोलले जात आहे काही दिवसा अगोदर यांची जिल्हा ग्रामपंचायत बदली करण्यात आली होती परंतु नंतर पुन्हा त्यांनी राजकीय स्त्रोत वापरून प्रचीरी करून शिरला ग्रामपंचायतचा कारभार आपल्याकडे करून घेतले असल्याची खमंग चर्चा आहे.
दोन दिवसा अगोदर शिरला ग्रामपंचायतच्या सरपंचासोबत आर्थिक बाबीतूनच तुम्हाला झाल्याची खमंग चर्चा लातूर शहरात असून ग्रामसेवकांवर लोकप्रतिनिधींना कोणताही वाचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे यामागे मोठे आर्थिक कारण असल्याचे सुद्धा पातुर शहरात चर्चा आहे अधिकाऱ्यांपर्यंत या भ्रष्टाचाराची मलिदा पोहोचत असल्याने कोणताही राजकीय पदाधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांवर वसंत ठेवत नसल्याचे बोलले जात आह.
गटविकास अधिकारी हे दोन चमचा ग्रामसेवकांच्या भरोशावर कारभार चालत असल्याची चर्चा असून लातूर शहरातील महत्त्वाचा भाग हा शिरला ग्रामपंचायत मध्ये असताना सुद्धा या ठिकाणी ग्रामसेवकाची मनमानी कारभार सुरू असून यावर गटविकास अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांचे यांना का आभारी आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिरला येथील ग्रामसेवकाला काही राजकीय पाठवा ची चर्चा असून लोकप्रतिनिधींच्या आशीर्वाद असल्याने आपले कोणीच काही करू शकत नाही अशा तोऱ्यात हे ग्रामसेवक वावरत असल्याची चर्चा आहे शिरला ग्रामपंचायत मधील गेल्या काही महिन्यातील कारभाराची वरिष्ठ अधिकारा मार्फत चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येणार असून सर्वसामान्यांची कामे न करणाऱ्या ग्रामसेवकाची शिरला येथून बदली करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे.
आज सकाळी साडेअकरा वाजता मी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामानिमित्त गेलो असता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप होते माझ्यासोबत पातुर शहरांना नजीक मधील जिल्हा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या गावातील काही नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायत करायला कुलूप असल्याने जवळपास दोन तास त्या ठिकाणी वाट पाहिली त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या कानावर ही बाब टाकल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी कार्यालयात हजर झाला.
अरुण भाजीपाले
नागरिक
२( ग्रामपंचायत कार्यालयात शिरला येथे काही नागरिक कामानिमित्त गेले असल्याची माहिती फोनवरून मिळाली यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना फोनवरून माहिती देऊन कार्यालयात तात्काळ उपस्थित राहून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचे सांगितल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी कार्यालयात उपस्थित झाले)
सागर कढोणे
ग्रामपंचायत सदस्य