Monday, December 30, 2024
Homeसामाजिकगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना…

संबंधितांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

अकोला – संतोषकुमार गवई

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबास मदत दिली जाते. संबंधितांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

यामध्ये १० ते ७५ वयोगटातील अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता विहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकर्‍याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील,शेतकर्‍याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) असे एकूण २ जणाकरिता योजना राबविण्यात येत आहे.

अपघातग्रस्त शेतकर्‍याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांना घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करतील. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांना सादर करतील.

तदनंतर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येवून संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येईल. योजने अंतर्गत सन 2023-24 मध्ये एकूण 62 लाभार्थी योजनेच्या लाभाकरिता पात्र ठरलेले आहेत.

योजने अंतर्गत १. रस्ता अपघात/रेल्वे अपघात २. पाण्यात बुडून मृत्यू ३. जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा ४. विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात ५. वीज पडून मृत्यू ६. खून ७. उंचावरून पडून झालेला अपघात ८. सर्पदंश व विंचूदंश ९. नक्षलाईटकडून झालेल्या हत्या १०. जनावरांच्या खाल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यू ११.बाळंतपणातील मृत्यू १२. दंगल १३. अन्य कोणताही अपघात, या अपघाताचा समावेश आहे.

तसेच १. नैसर्गिक मृत्यू २. विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व ३. आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे ४. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात ५. अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात ६. भ्रमिष्टपणा ७. शरीरातर्गत रक्तस्त्राव ८. मोटार शर्यतीतील अपघात ९. युद्ध १०.सैन्यातील नोकरी ११. जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश असणार नाही.

योजने अंतर्गत खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय असेल : –
अ.क्र. अपघाताची बाब आर्थिक सहाय्य
१ – अपघाती मृत्यू २,००,०००/-
२ – अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे २,००,०००/
३ – अपघातमुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे २,००,०००/
४ – अपघातमुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे १,००,०००/
तरी जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकरी / शेतकर्‍यांचे वारसदार यांनी कुटुंबात घटना घडली असेल तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. 

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: