Tuesday, December 24, 2024
Homeराज्य'लिंगभाव समानतेसाठी पुरूषांशी संवाद हवा' प्रशिक्षण संपन्न...

‘लिंगभाव समानतेसाठी पुरूषांशी संवाद हवा’ प्रशिक्षण संपन्न…

रामटेक – राजू कापसे

नुकतेच बुटीबोरी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ,(माविम) जिल्हा प्राधिकरणाद्वारे ‘लिंगभाव समानतेसाठी पुरूषांशी संवाद हवा’ या विषयावर जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. माविम प्रणित स्वयंसहाय्यता महिला बचत गटांतील परिवारातील पुरूषांशी संवाद साधून लिंगभाव संवेदनशीलता, स्त्री पुरुष समानता, महिला सक्षमीकरण आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.

प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच आई, बहिण,पत्नी,मुलगी अशी अनेक नाते सांभाळत कार्य करणाऱ्या महिलांकरीता पोषक सामाजिक वातावरण निर्माण झाले पाहिजे असा मौलिक संदेश देण्यात आला.सदर प्रशिक्षणाला रामटेक,मौदा, भिवापूर,कुही, काटोल ,हिंगणा, नागपूर ग्रामीण अशा एकुण सात तालुक्यातील 41 प्रतिनिधी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते.

प्रशिक्षक म्हणून रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड आणि युवा ग्रामीण च्या संचालक ज्योती नगरकर यांनी भूमिका पार पाडली. सदर प्रशिक्षणाचे आयोजन वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती ललिता दारोकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.असे प्रशिक्षण सात तालुक्यात आयोजित करण्यात आले असल्याचे श्रीमती ललिता दारोकर यांनी सांगितले. .GTM Supervision Mission टीम च्या Beatrice Gerli, Senior Technical दि.14/03/2024 रोजी माविम Specialists (Ifad Headquarter) तसेच Maryam Barodawala- Social Development GenderConsultant Mavim Mumbai यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
आंतरराष्ट्रीय रोम टीमच्या सदर टीममध्ये खालील प्रतिनिधी उपस्थित होते.

  1. Beatrice Gerli, Senior Technical Specialist (IFAD – Headquarter Rome)
  2. Gaytri Mahar -IFAD India Technical Expert
  3. Sarita Rout – IFAD GTM India Coordinator
  4. Gauri Donde – Team Leader MAVIM
  5. Maryam Barodawala – Social Development, Gender, Policy and Advocacy, Consultant

सदर भेटीदरम्यान जिल्हास्तरीय पूरक पोषण आहार थाली स्पर्धा चे नियोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत तालुक्यातील प्रथम, व्दितीय,तॢतीय क्रमांक आलेल्या 7 तालुक्यातील 21 महिला सहभागी झालेल्या होत्या. सदर स्पर्धेत महिलांनी विविध पारंपारिक पौष्टिक पदार्थ तयार केलेले होते. मिशन मेंबरने सदर ठिकाणी भेट देऊन सर्वच महिलांना प्रथम क्रमांक देऊन प्रोत्साहित केले.

तसेच जिल्हा स्तरावर पुरुषांकरिता लिंभसमभाव संचेतना प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणात एकूण 41 सभासद उपस्थित होते.प्रशिक्षणात वरिष्ठ तंत्रज्ञान तज्ज्ञ (Senior Technical Specialist), Beatrice Gerli यांनी कार्यशाळेतील पुरूषांसमवेत संवाद साधला.

माविम जिल्हा कार्यालयाव्दारे बचतगटा व्दारे निर्मित वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच गारमेंन्ट यूनिट ला प्रतिनिधी यांनी भेट दिली. त्यानंतर विभागीय संनियंत्रण अधिकारी श्री. राजू इंगळे यांनी COE चे सादरीकरण केले व त्याच प्रमाणे विभागीय सनियंत्रण अधिकारी श्री. केशवजी पवार यांनी सुद्धा COE बाबत मुद्दे मांडले व तसेच नागपूर विभागीय RDBS श्री. अमित गाडे यांनी गारमेंट क्लस्टर च्या पुढील नियोजनाबाबत माहिती दिली.

त्याच प्रमाणे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी सौ. ललिता दारोकर यांनी COE मध्ये kitchen garden, Canteen , दुचाकी दुरूस्ती केंद्र अशा उपक्रमांचे नियोजन असल्याची माहिती दिली. सर्व माविम नागपूर टीम आणि CMRC Managers यांनी GTM Supervision Mission success करण्यास योगदान दिले.यशस्वीतेसाठी श्रीमती प्रतिभा फाटे, भुषण कोरे,रूपेश यांचे सहकार्य लाभले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: